महिलांनी शारीरिक मानसिक सक्षम बनावे – पोलीस नाईक पालवे

Mypage

महिलांच्या सायकल स्पर्धेस उत्तम प्रतिसाद

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : महिलांनी आपले आरोग्य उत्तम ठेवावे. येणाऱ्या संकटाचा त्यांना सक्षमपणे मुकाबला करता यावा यासाठी त्यांनी  शारिरिक, मानसिक सक्षम होण्यासाठी दिवसातून किमान एक तास व्यायाम करावा. वाढते सायबर गुन्हे लक्षात घेऊन फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर, व्हाटस् अप वापरताना महिला व मुलींनी काळजी घ्यावी.

Mypage

समाज मध्यावर आपल्या फोटोचा गैरवापर होऊन चारित्र्य हनन होऊ शकते. ओ.टी.पी. नंबर कोणाला शेअर करू नका. असा सल्ला देऊन पोलिस आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात. पोलिस स्टेशनच्या तसेच ११२ नंबरवर संपर्क केल्यास तत्काळ मदत मिळू शकते अशी माहिती येथील सुवर्णपदक विजेत्या पोलीस नाईक संगीता पालवे यांनी दिली.

Mypage

      जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी, इनरव्हिल व शेवगाव सायकल कल्बच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलाच्या सायकल स्पर्धेचे बक्षिस वितरण अश्विनी गवळी व पोलिस नाईक पालवे यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.

Mypage

      यावेळी शेवगाव ते खरडगांव व परत शेवगाव या दहा कि.मी. गटात श्रावणी बाहेती यांनी प्रथम, अमृता लव्हाट द्वितीय, तर अनुश्री भोर्डे व आदिती घुगे यांनी तृतीय क्रमांक पटकावले. शेवगाव ते सोमठाणे फाटा या २० किमीच्या दूसऱ्या गटात वेदिका उगले व पुजा दहिवाळकर या दोघी प्रथम, पायल राऊत  द्वितीय, तर दिपाली  काथवटे या तिसऱ्या आल्या. तसेच ५ कि.मी गटात अनुक्रमें तनुष्का काथवटे, भक्ति  कुलकर्णी व इशिता परदेशी प्रथम, द्वितीय व तृतीय आल्या. विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली. एकूण ५२ महिलां स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

Mypage

   स्पर्धेच्या यशस्वी साठी सहाशे किलोमीटर सुपर रायडर ( एस आर ) विजेत्य डॉ. स्मिता व डॉ .प्रदिप उगले दांपत्य, डॉ. संजय लड्डा, डॉ. आशिष लाहोटी, सायकल क्लबचे अध्यक्ष विनोद ठाणगे, समन्वयक डॉ. संदीप बोडखे, हरीश शिंदे , आबासाहेब नेमाने, निळकंठ लबडे, राम नेव्हल, प्रदिप बोडखे, वसंत सुरवसे, वल्लभ लोहिया प्रशांत सुपेकर,  डॉ.योगेश फुंदे, डॉ.जगदीश कुलकर्णी, डॉ.मयुर लांडे, मनीष बाहेती, भागनाथ काटे, कारभारी नजन, कैलास जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.
डॉ. मनीषा लढ्ढा यांनी प्रास्तावित केले. सविता लोंढे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ.शिल्पा देहाडराय यांनी आभार मानले. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *