कोपरगांव तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कर्णासाहेब शिंदे यांची निवड 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ :  कोपरगांव तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कर्णासाहेब सजनराव शिंदे यांची नुकतीच निवड झाली आहे. पेन्शनर्स असोएिशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. त्यात कर्णासाहेब शिंदे यांच्या नावाची सुचना ए. डी. देशमुख यांनी केली तर त्यास एस. बी. उगले यांनी अनुमोदन दिले. कोषाध्यक्ष म्हणून संपतराव भागुजी आसणे यांची निवड करण्यात आली त्यासाठी एस. आर. बंगाळ यांनी सुचना तर एस. वाय. चौधरी यांनी अनुमोदन दिले.

Mypage

              प्रारंभी असोसिएशनचे माजी अध्यक्ष कै. बाजीराव कोपरे व कोशाध्यक्ष कै. आनंदराव जोरी यांच्यासह अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपाध्यक्ष ज्ञानदेव दवंगे यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन करून सर्वांच्या संमतीने त्यास मंजुरी देण्यांत आली.

Mypage

नवनिर्वाचित अध्यक्ष कर्णासाहेब शिंदे व कोषाध्यक्ष संपतराव आसणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देतांना नवनिर्वाचित अध्यक्ष कर्णासाहेब शिंदे म्हणाले की, पेन्शनरांच्या समस्या सोडविणे हीच खरी समाजसेवा असून त्यादृष्टीने कार्यरत राहुन आवश्यकता भासेल त्याठिकाणी मार्गदर्शन देवु. सचिव मधुकर मोरे यांनी अहवाल वाचन करून सखोल मार्गदर्शन केले.

Mypage

            याप्रसंगी कोपरगांव तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे सर्व सभासद, शिक्षकवृंद, श्रीमती प्रयागाताई धनवटे, एस. जी. पोटे, एस. एम. हांडे, आर. जी. जेऊघाले, सी. के. भारूड, जी. के. कोताडे, एस. एन. गणोरकर, एस. बी. जोर्वेकर आदि उपस्थित होते. शेवटी आर. जी. खानापुरे यांनी आभार मानले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *