प्रविण खटकाळे यांना पीएचडी प्रदान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : तालुक्यातील छोट्याशा लौकी खेडेगावातील प्रवीण बाळासाहेब खटकाळे यांनी डॉ. आलोक अग्रवाल आणि डॉ. अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीशप्रसाद जबरमल टिब्रेवाला युनिव्हर्सिटी राजस्थान येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी. पूर्ण केली. 

त्यांनी “इफेक्टिवनेस ऑफ झर्नाइक मोमेंट्स आणि रॉबस्ट आयरिस रेकग्निशनवरील आंशिक वैशिष्ट्ये” ह्या विषयावर संशोधन केले. प्रवीण हा सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब खटकाळे यांचा मुलगा असून सध्या तो संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत कार्यरत आहे.

त्यांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी पदवी आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांच्या यशाबद्दल विविध मान्यवरांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.