कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी सर्वधर्म समभाव जपताना नेहमीच सर्व जाती धर्माचा आदर करून सर्व समाजाच्या सण उत्सवात काळे परिवार सहभागी होतो. ही परंपरा माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील जपली. काळे परिवाराचा हा वारसा पुढे चालवितांना मला देखील सर्व समाजाकडून भरभरून प्रेम मिळत असून यात मुस्लिम समाज देखील कुठेही मागे नसून मुस्लिम समाज सदैव काळे परिवाराच्या सोबत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. कोपरगाव येथील गौतम बँकेच्या प्रांगणात पवित्र रमजान महिन्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पवित्र रमजान महिन्यात ४० अंश सेल्सिअस तापमान असतांना मुस्लिम बंधू भगिनी करीत असलेले उपवसातून रमजानच्या पवित्र महिन्याचे धार्मिक महत्व अधोरेखित होते.निवडून आल्यापासून मतदार संघातील मस्जिद, कब्रस्तान उर्दू शाळा इमारतींना मोठ्या प्रमाणात निधी देवून इतर समाजाप्रमाणे मुस्लिम समाजाला देखील न्याय दिला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पहिल्यांदाच रोजाचा उपवास धरणाऱ्या नन्हे रोजगाराचा घास भरवून त्याचा उपवास सोडवला. यावेळी मौलाना निसारभाई अहमद नदवी, मौलाना यासीनभाई मित्ली, मौलाना अबजलभाई मित्ली, मौलाना मुक्तारभाई मित्ली, मौलाना अनिसभाई मित्ली आदींसह कोपरगाव मतदारसंघातील मुस्लिम बांधव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.