विविध कार्यकारी सहकारी संस्था ह्या ग्रामिण भागाचा अर्थीक कणा – विवेक कोल्हे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८:  विविध कार्यकारी संस्थाची विकासाला मदत आजपर्यत झाली आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने सहकारला मदत होत आहे. केंद्राने सहकार मंत्रालय स्थापन करुन सहकाराला बळकटी दिली आहे. देशभरात लाखो सहकारी सोसायट्या आहेत या सर्व सोसायट्यांचे संगणीकरण करुन एकाच प्लाटफॅार्मवर आणण्याचे काम लवकरच होण्याचे चिन्हे आहेत.

Mypage

सोसायटी सक्षम झाली तरच पुढील उपाययोजना करता येतात. म्हणुन सर्वांनी सोसायटीचे हीत जोपासले पाहीजे. राजकारण हे निवडणुकीपुरते असले पाहीजे.भविष्यात सहकारी सोसायट्यांना फार्मर प्रोड्युसर कंपन्याचा दर्जा देण्याचा विचार केंद्र सरकारचा आहे.

tml> Mypage

गावातील पैसा गावातच राहीला तर त्याचा फायदा गावाला होतो.सहकारी संस्थानी शास्वत उत्पादनाचे स्त्रोत शोधले पाहीजे. विविध कार्यकारी सहकारी संस्था ह्या ग्रामिण भागाचा अर्थीक कणा आहेत.असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केले

Mypage

अंजनापुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत कोल्हे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब गव्हाणे होते. यावेळी बबन महाराज गाडेकर यांना संतकवी पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे कारखान्यास विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सोसायटीच्या  वतीने सत्कार करण्यात आला.

Mypage

        यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब गव्हाणे, संस्थेचे संचालक रगंनाथ गव्हाणे, चंद्रभान गव्हाणे, खंडेराव गव्हाणे, कमलबाई गव्हाणे, दादासाहेब गव्हाणे, सविता गव्हाणे, भास्कर गव्हाणे, सावळेराम गव्हाणे, सुकदेव गव्हाणे यांचेसह उद्योजक प्रल्हाद गाढे, दशरथ कोटकर,अर्जुन गव्हाणे, रामनाथ गव्हाणे, जिजाबापु गव्हाणे, सिताराम गव्हाणे आदिसह सभासद व हितचिंतक उपस्थीत होते. अहवाल वाचन सचिव रामनाथ वाकचौरे यांनी केले.सुत्रसंचालन रंगऩाथ गव्हाणे यांनी तर आभार चंद्रभान गव्हाणे यांनी मानले.

Mypage