डायनिंग टेबलवर मुलां-मुलींसोबत शालेय पोषण आहाराचा आस्वाद

शेवगाव प्रतिनीधी, दि.३० : शेवगाव पंचायत समितीच्या शालेय पोषण आहार अधिक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांनी लखमापुरी (ता. शेवगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला अचानक भेट दिली. या वेळी लोकसहभागातून दिलेल्या डायनिंग टेबलवर मुलां-मुलींसोबत प्रधानमंत्री शालेय पोषण आहाराचा आस्वादही त्यांनी घेतला.

पोषण आहाराचा दर्जा व डायनिंग टेबलसाठी दिलेल्या लोकसहभागाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी शाळेने राबविलेले विविध उपक्रम, मिशन आपुलकी अंतर्गत लोकसहभाग, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेच्या दर्जाबद्दल त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचे  कौतुक करून उपस्थिती व शैक्षणिक दर्जात सातत्य ठेवणयाच्या सूचना केल्या.

एक सुंदर शाळा पाहण्याचा योग आला, अशा शब्दांत त्यांनी मुख्याध्यापक पांडुरंग नागरे, शिक्षक रविंद्र सुपारे, रजनी भोवते यांचे कौतुक केले. विषय तज्ञ दशरथ गायकवाड, अनिल जाधव, पांडुरंग खरड, राणेगावचे केंद्रप्रमुख बबन ढाकणे आदी उपस्थित होते.