श्रीगणेशचा शुभम महाराष्ट्र सीईटीमध्ये  राज्यात ११वा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ :  शैक्षणिक वर्ष २०२२  मध्ये झालेल्या अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये श्रीगणेशच्या विद्यार्थ्यानी यश संपादन केले आहे. या परीक्षेत औषधनिर्माण शास्त्र सीईटी मध्ये शुभम राजेंद्र येलमामे ९९.९७  गुण मिळवून  राज्याच्या  गुणवत्ता यादी मध्ये ११ वा  आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी दिली.

 महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई तर्फे घेण्यात महाराष्ट्र सीईटी परिक्षा ३६ जिल्ह्यांमध्ये २२७ परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या बॅचेसमध्ये घेण्यात आल्या. या परिक्षेमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील जवळपास ४ लाख ६७ हजार १२ वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी या परिक्षेला आपला सहभाग नोंदविला. या परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र व कृषी शिक्षण या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला जातो.

         शुभम बरोबरच सानिया मणियार ९९.७५ , श्रद्धा वाकचौरे ९९.२२, ऋषिकेश गावित ९९.००, प्रतीक्षा खालकर ९८.९६, अलिशा सपकाळ ९८.९२ , आदित्य जाधव ९८.४४, सुमित मेहेरखांब ९८.२० तर अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये साईप्रसाद खैरनार ९९.६२, ईश्वरी गोंदकर ९८.७९, गौरी कोकाटे ९८.३९ , शुभम येलमामे  ९८.३४, सानिया मणियार ९८.३३ परसेंटाईल गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र सीईटी मध्ये एकूण ५८ विद्यार्थ्यांनी ९० परसेंटाईल च्या पुढे गुण मिळविले आहेत. श्रीगणेश पॅटर्न व कॉलेज मार्फत दिलेल्या ऑनलाईन टेस्टमुळे विद्यार्थ्यांना या परिक्षा घेणे सोपे झाले असल्याचे यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले.

          या सर्व विद्यार्थ्यांना श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी शुभेच्छा दिल्या व या बाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की कोविड प्रकोप काळात व त्यांनतर श्री गणेश शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली. त्याचेच फलित म्हणजे आय आय टी साठी खैरनार साईप्रसाद, जेइइ मेन्स साठी ३२ विद्यार्थी, नीट परीक्षेसाठी ५०० गुणांच्या पुढे ५  विद्यार्थी तर महाराष्ट्र सीईटी मध्ये  ९० परसेंटाईल च्या पुढे एकूण ५८ विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत.
              सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी,सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, देवीदास दळवी, महावीर शिंगवी, प्राचार्य रियाज शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.बापू पुणेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रा.प्रवीण दहे, प्रा. सागर हिंगे, प्रा.योगेश  फटांगरे, प्रा.अमोल कोतकर, प्रा. साहिल सय्यद, प्रा.गौरव लहामगे, प्रा.ऋषिकेश आंत्रे, प्रा.पूजा चांदगुडे यांचे मागर्दर्शन लाभले.