सुभद्रानगर, मार्केट यार्ड परिसरात उपडाकघर सुरू करा – राष्ट्रवादीची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : पोस्ट ऑफिस सुविधा व शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित असणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस सुविधेचा लाभ मिळावा यासाठी सुभद्रानगर, मार्केट यार्ड परिसरात उपडाकघर सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डाक अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात  करण्यात आली आहे. हे निवेदन कोपरगाव पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर विशाल गवळी यांनी स्वीकारले.

निवेदनात असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मार्केट रोडवरील सुभद्रानगर मध्ये यापूर्वी उपडाकघर होते त्यामुळे नागरिकांना अनेक योजनांचा फायदा मिळत होता. मात्र हे उपडाकघर बंद करण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील सुभाषनगर व परिसरात मोठी लोकसंख्या आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, नागरिक,  शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपडाकघर कार्यालयाची या परिसरात अत्यंत गरज आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना पोस्टमार्फत राबविल्या जातात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांना सोयीस्कर होण्यासाठी या परिसरात उपडाकघर कार्यालय सुरू करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी माजी नगरसेवक कृष्णा आढाव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कार्तिक सरदार, सोमनाथ आढाव अनिरुद्ध काळे, राजेश सावतडकर, रुपेश वाकचौरे, संदीप सावतडकर, गौरव व्यवहारे, राहुल हंसवाल, प्रतीक गिते, योगेश वाणी, बंडू आढाव, रुपेश गवळी, कारभारी जगताप, संदीप सावतडकर, अश्पाक शेख, प्रफुल्ल विघे, संतोष भुजबळ, सुमित भोंगळे, भूषण मराठे, आशुतोष देशमुख, योगेश आगवण, निलेश रुईकर,

पियुष अग्रवाल, दिपक बर्डे, अमोल जाधव, विवेक रासकर, विकास आढाव, अमित लोढा, बाळासाहेब गायकवाड, सोमनाथ भगूरे, ललिता गिरमे, विलास ताम्हाणे, अथर्व पाखले, सागर राऊत, महेश बागडे, परीक्षित साबळे, डॉ. सूर्यवंशी, बापू मोरे, संदीप म्हस्के, आश्विन सुराळे, सचिन कुटाफळे, बाळासाहेब भांगरे, लता साळुंके, संग्राम देवकर, शुभम बनकर, धनंजय देवकर, प्रमोद पवार,  रुपेश वाकचौरे, गायकवाड आदी उपस्थित होते.