संजीवनी इंजिनिअरींगच्या १९ अभियंत्यांची केपीआयटीत निवड – अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १४ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या पुढाकरातुन केपीआयटी टेक्नॉलॉजिज कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत तब्बल १९ नवोदित अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रू ६ लाखावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. संजीवनीच्या प्रयत्नाने गरजु नवोदित अभियंत्याना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच मिळत असल्याने खऱ्या  अर्थाने विध्यार्थी व पालकांची स्वप्नपुर्ती होत आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
   

पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, केपीआयटी टेक्नालॉजिज ही एक भारतीय बहुराष्ट्रीय  निगम आहे जी ऑटोमोटिव्ह कंपन्यांना एम्बेडेड सॉफ्टवेअर आणि उत्पादन अभियांत्रिकी सेवा प्रदान करते. केपीआयटी म्हणुन प्रसिध्द असलेल्या या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे आणि भारताव्यतिरिक्त युरोप, यूएसए, जपान आणि चीनमध्ये तिची विकास केंद्रे आहेत. या कंपनीत नोकरी मिळाल्याने तब्बल १९ अभियंत्यांच्या जीवनातील हा सुवर्ण क्षण आहे. यात निवड झालेल्या अभियंत्यांमध्ये वरूण भारद्वाज, ऋषिकेश  भाऊसाहेब कदम, श्वेतार्क  सुनिल कदम, दिनेश  संजय काळे, अमित सुनिल पवार, सोहन संजय उबाळे,

श्रध्दा रविंद्र मेहेत्रे, कुणाल सतीश  भंडारे, अमित संपत निर्मळ, वैष्णवी विवेक  महाजन, अक्षय पंढरीनाथ बेंद्रे, संदिप बाबासाहेब नवले, अक्षय शिवाजी  मोमाळे, श्रृती सुनिल गागरे, आदिती ज्ञानेश्वर  कुरकुटे,वैष्णवी  रामनाथ वाघ, गायत्री चिंताराम साबळे, स्नेहल सोपान अव्हाड व राहुल शिवाजी  जगझाप या प्रज्ञावंतांचा समावेश  आहे. हे सर्व विध्यार्थी ग्रामिण भागातील असुन त्यांच्या केपीआयटीच्या निवडीमुळे कार्पोरेट विश्वात प्रवेश  होत आहे, ही त्यांच्या जीवनातील महत्वपुर्ण घटना असणार आहे.      

    संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत प्रत्येक कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या अगोदरच नव्हे तर अगदी पहिल्या वर्षांपासून  मुलाखतींना कसे सामोरे जायचे, याची पुर्व तयारी करून घेण्यात येते. यामुळे मोठ्या प्रमाणात संजीवनीने आपल्या अभियंत्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळवुन देण्यात आघाडी घेतली आहे, असे कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले अभियंते व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून नवोदित अभियंत्यांच्या कार्पोरेट जीवनातील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या उपस्थित विध्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागचे डीन डॉ. व्ही. एम. तिडके, विभाग प्रमुख डॉ. डी. बी. क्षिरसागर, डॉ. बी. एस. आगरकर, डॉ. एम. ए. जावळे व डॉ. डी. बी. परदेशी  उपस्थित होते.

loksanvad Avatar