ज्योती पतसंस्था राज्यात ठरली अव्वल

Mypage

 ज्योती पतसंस्थेला २०२३चा बॅंको ‘ब्लू रिबन’ पुरस्कार जाहीर

Mypage

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : गेल्या ३७ वर्षांपासून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली ज्योती नागरी सहकारी पतसंस्था आता राज्यात अव्वल ठरली असुन ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेला सन २०२३ चार बॅंको ब्लू रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने राज्याच्या सहकारी पतसंस्थामध्ये ज्योती पतसंस्थेचे कार्य अधिक उंचावले आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन ॲड. रविंद्र बोरावके यांनी दिली. 

Mypage

 या संदर्भात अधिक माहिती देताना चेअरमन ॲड. रविंद्र बोरावके म्हणाले की, ज्योती पतसंस्थेचं कामकाज सातत्याने अतिशय पारदर्शक आहे. रितरस काम करुन नागरीकांना योग्या सुविधा देण्यात संस्था प्रयत्नशील असते. संस्थेच्या एकुणच कामकाजामुळे नागरीकांचा विश्वास वाढत गेला. ज्योती पतसंस्थेच्या एकुण ९ शाखा असुन ३१५ कोटींच्या ठेवी, २६० कोटींचे कर्ज वितरण, शंभर टक्के कर्जवसुली, गेल्या ३७ वर्षांपासून शुन्य टक्के थकबाकी असलेली ही पतसंस्थ लोकाभिमुख कार्य करत आहे. म्हणुनच अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इन्मा पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा व सहकार क्षेत्रात महत्वाचा समजला जाणारा राज्यस्तरीय सन २०२३ चा बॅंको ब्लू रिबन हा पुरस्कार नागरी सहकारी पतसंस्था विभागात २५० ते ३०० कोटी पर्यंत ठेवी असलेल्या गटात ज्योती पतसंस्थेला जाहीर झाला आहे.

Mypage

आर्थिक वर्ष सन २०२२-२३ साठी अविज पब्लिकेशन कोल्हापूर यांनी सादर केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे तज्ञ समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार राज्यातील १२ पतसंस्थामधुन ज्योती पतसंस्थेची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १४ फेब्रुवारी रोजी डेल्टीन रिसाॅर्ट दमन येथे संपन्न होणार आहे.  ज्योती पतसंस्थेला या पुर्वीही सलग नऊ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Mypage

संस्थेला मिळालेल्या या पुरस्कारामध्ये संस्थे सर्व संचालक, ठेवीदार, कर्जदार, सभासद यांचा मोलाचा वाटा आहे. ग्राहकांनी संस्थेवर कायम विश्वास दाखवून सहकार्य केल्यामुळे संस्थेच्या कार्याची उंची अधिक वाढत आहे. त्यामुळे  हा पुरस्कार मिळाल्याबद्दल चेअरमन ॲड. रविंद्र बोरावके व संचालक मंडळ यांनी सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन केले आहे.  

Mypage