श्री गणेश मध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा बालकांचे हक्क व कर्तव्य जाणीव

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : तालुका विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ, राहाता व शिक्षण विभाग पंचायत समिती, राहाता यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित “बालकांचे हक्क व कर्तव्य जाणीव जागृती कार्यशाळा “श्री गणेश शैक्षणिक संकुल, कोऱ्हाळे येथे काल शनिवार दिनांक २२ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.

Mypage

 यावेळी सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर राहाता अभिजित देशपांडे, सहायक सरकारी वकील गौरव बोर्डे, गटशिक्षणाधिकारी राजेश पावशे, वकील अक्षय चांगले, साकुरी केंद्रप्रमुख अरुण बनसोडे, पंचायत समिती राहाता विशेषतज्ञ सविता कवडे, कनिष्ठ लिपिक एल काशीद, श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, प्राचार्य रियाज शेख, उपप्राचार्य प्रवीण दहे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. बापु पुणेकर हे उपस्थित होते.

Mypage

या कार्यक्रमाच्या व्यासपिठावरून सह दिवाणी न्यायाधीश अभिजित देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मुलांचे मूलभूत हक्क, बेटी बचाव बेटी पढाओ, बाल न्याय कायदा २०१५, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, मुलांसाठी बालस्नेही कायदेशीर सेवा आणि त्यांचे संरक्षण यांचे ज्ञान अवगत करून दिले.

Mypage

सरकारी वकील गौरव बोर्डे यांनी विद्यार्थ्यांना दररोजच्या जीवनातील सोशल मीडिया वापराचे फायदे आणि तोटे समजावून सांगितले. श्री गणेश शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी योग्य दिशा मिळते. अभियांत्रिकी व वैद्यकीय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते, तसेच या संकुलाची परिसरात शिस्तप्रिय शैक्षणिक संकुल अशी ओळख निर्माण झालेली आहे, असे मत गटशिक्षणाधिकारी राजेश पावशे यांनी व्यक्त केले. 

Mypage

या वेळी शैक्षणिक संकुलातील सर्व विद्यार्थी, शिक्षण प्रेमी पालक व श्री गणेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे,कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, आकाश छाजेड, चिराग पटेल, गणेश कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *