मा.आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते उजनी योजनेचे जलपूजन संपन्न 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० :  जवळके, धोंडेवाडी परिसरातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी महत्वाची ठरलेली उजनी पाणी योजना कार्यान्वित करून मा. आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. ही योजना वीजबिल थकल्याने बंद होती ती सुरू होण्यासाठी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या आर्थिक सहकार्याची भूमिका महत्वाची ठरली. त्यामुळे या परिसरात चैतन्य पसरले आहे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Mypage

या वेळी बोलताना स्नेहलता कोल्हे यांनी या भागातील पाणी प्रश्नासाठी प्रकृती खराब व दुसऱ्या दिवशी हृदयाशी निगडित शस्त्रक्रिया ठरलेली होती. अशा वेळी बिपीन कोल्हे यांनी केलेल्या पाणी आंदोलनाची आठवण देत उपस्थितांना या भागाचे सुवर्ण दिवस येण्याच्या दृष्टीने भूमिका मांडली. उजनी टप्पा एक चे वीजबिल थकल्याने पाणी प्रश्न जिकरीचा बनला होता. त्यावर विवेक कोल्हे यांनी तत्काळ आर्थिक सहकार्य केल्याने अडचण सुटली. सद्याची तरुण पिढीला आपले मार्गदर्शन देऊन अधिकाधिक वेगाने आपल्या भागाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहू यासाठी अफवा आणि अर्धसत्य माहिती वर भूमिका न घेता व्यापक निर्णय घेऊ.

Mypage

इतरत्र हिरवळ आणि आपला भाग मात्र, दुष्काळाच्या झळा सोसणे हे चित्र बदलण्यासाठी माझी लढाई नेहमी सुरू असेल. निळवंडे चाऱ्यांचे प्रश्न पूर्णत्वास गेल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. शेतकरी आणि कष्टकरी यांना दिलासा मिळावा यासाठी माजी मंत्री स्व.कोल्हे साहेब यांनी अनेक पाठपुरावा केला. त्यांनतर मलाही महिला प्रतिनिधी म्हणून संधी मिळाली त्यावेळी मी शासनाकडे निळवंडे धरणासाठी निधी मिळावा म्हणून आग्रह धरला व मोठा निधी मिळाला हे माझ्या भाग्य आहे.

Mypage

केवळ ओव्हरफ्लो पाण्यातच ही योजना कार्यान्वित असते मात्र, दुष्काळी परीस्थिती पाहून कोल्हे कुटुंबाने विशेष बाब म्हणून ही योजना वीजबिल भरून शेतीच्या आवर्तनातून कार्यन्वित करून घेतली त्याबद्दल या परिसरात समाधानाचे वातावरण असून नागरिकांनी कोल्हे यांचे आभार मानले आहे.

या भागात निळवंडेचे पाणी पाहून डोळ्यात आनंदअश्रू अनेकांना आले कारण अनेक पिढ्यांचा संघर्ष आहे. या पुढेही या भागासाठी मोठे काम मला व विवेक कोल्हे यांनी करायचे आहे. त्यामुळे आपण पाठीशी राहून आशीर्वाद द्यावे असे आवाहन शेवटी कोल्हे यांनी केले. एस के थोरात, नानाभाऊ गव्हाणे, संपत दरेकर, भाजपा तालुकाध्यक्ष कैलास रहाणे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम पाचोरे, धोंडेवाडी उपसरपंच रोहिणी नेहे, टी.डी.संचालक बंडूभाऊ थोरात, जवळके सरपंच विजय थोरात,

Mypage

वाल्मीक नेहे, बहादराबाद सरपंच अश्विनी पाचोरे, प्रभाकर रहाणे, सुनील थोरात, रामनाथ गव्हाणे, बाबासाहेब थोरात, ज्ञानदेव थोरात, बाळासाहेब काकडे, राजेंद्र कोल्हे, बाबासाहेब नेहे, गोरख दरेकर, हरिदास रहाणे, निवृत्ती दरेकर, राजेंद्र नेहे, गोरख रहाणे, महेश थोरात, परसराम शिंदे, वाल्मीक भोसले, प्रवीण घारे, तुकाराम गव्हाणे, नवनाथ भडांगे, नानासाहेब काकडे, शांताराम नेहे यासह बहादराबाद, जवळके, धोंडेवाडी, बहादरपुर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Mypage