आयुष्यमान भारत कॅम्पमधून १६० लाभार्थीनी घेतला लाभ

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : शेवगावातील वडार गल्लीतील नागरिकांचे उद्बोधन करून आवश्यक कागदपत्राची माहिती देऊन त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार माजी नगरसेवक सागर फडके यांनी आयोजित केलेल्या आयुष्यमान भारत कार्ड शिबीरास तेथील नागरिकानी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी १६० नात्ररिकांनी ही कार्डे काढली.

या शिबीराला  मिळालेल्या प्रतिसादामुळे फड़के यांचा उत्साह वाढला असून शहराच्या विविध भागातील नागरिकांसाठी पुढील काळात अशी शिबीरे आयोजित करणार असल्याचे मनोगत फडके यांनी यावेळी व्यक्त केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी अमोल जाधव, संदीप गवळी आशा स्वयंसेविका सुमित्रा गणेश महाजन, रंजना जगदीश परदेशी, महादेव मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.