गरीब घरकुल धारकांना देणार मोफत वाळू – प्रशांत सांगडे

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.११ :  शेवगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी आवास घरकुल योजनेत मंजूर झालेल्या मात्र, वाळू अभावी रखडलेल्या लाभार्थ्यांना महसूल विभागाने जप्त केलेली वाळू मोफत देण्याचा निर्णय शेवगावचे कर्तव्यदक्ष तथा सकारात्मक निर्णय घेण्यात माहीर असलेले तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील अनेक गरजू, गरीब वाळू अभावी घरकुल पूर्ण करण्याच्या विवंचनेत असलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mypage

यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण नुकतेच आपल्या सहकार्या सह तहसीलदार सांगडे यांना भेटले असता त्यांनी तहसीलच्या आवारातील मोठ्या प्रमाणात जप्त केलेली चोरीची वाळू या गरीब लाभार्थ्यांना द्यावी अशी विनंती केली होती. यावेळी महसूल विभागाने वेळोवेळी कारवाई करून जप्त केलेली वाळू जर गरजू व गरीब घरकुलधारकांना मोफत दिली तर आवारात इतरत्र पडलेल्या वाळूची विल्हेवाट लागेल व घरकुलधारकांना घरकुलांचे कामही तात्काळ मार्गी लावता येईल असा विचार व्यक्त केला.  

Mypage

तहसीलदारांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. असे अधिकारी असतील तर सर्वसामान्य लोकांना प्रशासनाकडून न्याय मिळेल. तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची आज गरज असून अशा सामाजिक भान ठेवून चांगले काम करणाऱ्या  अधिकाऱ्यांसोबत वंचित आघाडी कायम राहील. प्रा. किसन चव्हाण राज्यउपाध्यक्ष वचित बहूजन आघाडी. 

तेव्हा तहसीलदार सांगडे यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या विधायक मागणीला क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ मान्यता दिली. आता अशा घरकुलधारकांनी गटविकास अधिकाऱ्यांचे घरकुल कार्यारंभाचे पत्र द्यायचे म्हणजे त्यांना एका घरकुला साठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल. फक्त या वाळू वाहतुकीचा खर्च संबंधित घरकुल धारकाला करावा लागणार असून आज किमान शंभर ब्रास पेक्षा अधिक बारीक नंबर एकची वाळू या लाभार्थ्यांना मिळणार आहे. यावेळी वंचित चे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, रवींद्र निळ, गोरख तुपविरे, अरविंद साळवे आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Mypage