वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढणार – आमदार काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी उपकेंद्राची वीज पुरवठा करण्याची क्षमता वाढवावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून वारी उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची मंजुरी मिळविली होती. त्या मंजुरीच्या माध्यमातून वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी अपेक्षित असलेल्या ६० लाख रुपये खर्चाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

Mypage

कोपरगाव मतदार संघातील रस्ते, पाणी आदी मूलभूत प्रश्नांबरोबरच अनेक वीज उपकेंद्र कमी क्षमतेचे असल्यामुळे वीज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नव्हता. यामध्ये तालुक्याच्या पूर्व भागातील वारी वीज उपकेंद्राचा देखील समावेश होता. याबाबत वारी वीज उपकेंद्राला जोडलेल्या अनेक गावातील नागरिकांची या वीज उपकेंद्राची क्षमता वाढवावी अशी मागणी होती.

Mypage

त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याची ऊर्जा विभागाने दखल घेऊन वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी मंजुरी दिली होती. त्या मंजुरीतून वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी ऊर्जा विभागाने या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यासाठी ६० लक्ष रुपये खर्च अपेक्षित असून या खर्चातून ३ एम. व्ही. ए. ची क्षमता असलेले वारी वीज उपकेंद्र ५ एम. व्ही. ए. करण्यात येणार असून लवकरच क्षमता वाढीचे काम सुरू होणार आहे.

Mypage

हे काम पूर्ण होताच या वीज उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील घरगुती व कृषी वीज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होणार असून पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होणार असल्यामुळे वारी वीज उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील घरगुती व कृषी वीज ग्राहकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Mypage

वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढणार असल्यामुळे पूर्व भागातील अनेक गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर चांदेकसारे व ब्राम्हणगाव येथे नवीन वीज उपकेंद्रास मंजूरी मिळाली असून त्यापैकी ब्राम्हणगाव वीज उपकेंद्र निविदा प्रक्रियेत आहे. रवंदे वीज उपकेंद्राची क्षमता वाढ मंजुरी प्रक्रिया सुरु आहे.

Mypage

तसेच खिर्डी गणेश (येसगाव), कोकमठाण, शिंगवे या वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, शिंगवे ते पुणतांबा व काकडी ते रांजणगाव नवीन ३३ के.व्ही. लिंक लाईन टाकणे पुणतांबा येथील ११ के.व्ही. बजरंगवाडी, रस्तापूर, रामपूर, पुणतांबा स्वतंत्र फिडर करण्याच्या कामास देखील मंजुरी मिळालेली असून त्या कामाच्या देखील निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *