राष्ट्रवादी कॉंग्रेस बुथ कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आमदार लहामटे यांचे शक्तिप्रदर्शन 

अकोले प्रतिनिधी, दि. ५ : मी तुमचा लेकरू आहे, लेकराची शप्पथ माणून आपल्या सर्वांना महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना मताधिक्य द्यावेच लागेल. मला ताठ मानेने जगण्याची सवय आहे, खाली पहायला लावू नका असे सांगत उपस्थित सर्व बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांना आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भावनिक साद घातली. मागच्या निवडणूकीत ३२ हजाराचे लिड दिले ते भेटायला आले नाही फिरकुनही पाहिले नाही असा उमेदवार कशाला असावा, उलट खासदार सदाशिव लोखंडे यांनी अकोले तालुक्यात तीनशे कोटींची कामे केली आहे. पुढील विकास कामासाठी आता आपल्याला महायुतीचे उमेदवार लोखंडेना मताधिक्य देण्यासाठी कामाला लागा असे अवाहन कार्यकर्त्याना आमदार लहामटे यांनी केले. 

शिर्डी लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आमदार डॅा.किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी बुथ कार्यकर्ता संवाद मेळावा मातोश्री लॅान्स येथे मोठ्या जनसमुदायाचे उपस्थित पार पडला. यावेळी अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर हे अध्यक्षतेस्थानी होते. याप्रसंगी आ.डॅा.किरण लहामटे, शिवसेनेचे मतदारसंघ समन्वयक व मुख्यमंत्रीचे निकटवर्ती भाऊसाहेब चौधरी, संजिव भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचौरे, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, डॅा.चेतन लोखंडे, महिला जिल्हाध्यक्षा स्वाती शेणकर, निताताई आवारी, तालुकाध्यक्ष शरद चौधरी, युवक अध्यक्ष अक्षय अभाळे, पर्बतराव नाईकवाडी, ॲड.वसंतराव मनकर, अशोकराव देशमुख, डॅा.मनोज मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय वाकचौरे, ईश्वर वाकचौरे, सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आ.डॅा.किरण लहामटे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की, महायुतीने देशाच्या सर्वोच्चपदी एका आदिवासी महिलेला बसवून आदिवासी समाजाचा सन्मानच केला आहे. पंतप्रधान नरेद्र मोदीनी कोवीडचे मोफत लसीकरण, पिएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केद्राचे ६ व राज्याचे ६ असे १२ हजार रुपये खात्यावर दिले आहे. गारपिट झाली सरकारने पैसे दिले आहे. हर घर जल, हर घर नल ही मोदी साहेबांची महत्वकांशी योजना असल्याचे प्रत्येक गावगावात जलजिवन माध्यमातून पाणी देण्याचे काम मोदी साहेबांनी केले आहे. आपल्या तालुक्यातही जलजिवनचे काम सुरु आहेत. महिलांच्या डोक्यावरील हंडा दुर करुन प्रत्येक घराला पाणी देण्याचे काम मोदीनी केले.

आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारने महिलांना ५० टक्के दर सवलत एस टी प्रवासात दिले आहे. कोल्हार घोटी रस्त्यासह रस्त्याची कामे मार्गी लागली,  सिन्नर रस्ता पूर्ण होतोय डोगरदऱ्याचे भगासह संपूर्ण तालुक्यातील रस्ते होत आहे. तालुक्यात हे सर्व कामे महायुतीचे माध्यमातून होत आहे. सगळीकामे दर्जेदार होत आहे हि कामे होत असताना आपण लोकांना हेलपाटे मारायला लावले नाही. त्यामुळे ही सभा उमेदवार लोखंडे यांच्यासाठी तर आहेतच तर मोदी साहेबांना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहेत. यावेळी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी झटून काम करुन लोखंडेना मताधिक्य दयायचे आहे, तुमचे प्रश्न सोडवायला मी सदैव हजर आसल्याचा विश्वास आ.डॅा.लहामटे यांनी दिला.

यावेळी जेष्ठ नेते सीताराम गायकर म्हणाले कि, हि निवडणूक देशाचे भवितव्याची निवडणूक आहे हि जिल्हा, तालुका पातळीची निवडणूक नाही. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हातात पुन्हा देश देण्यासाठीची हि निवडणूक आहे. आज इतर शेजारील राष्ट्राची आपल्या देशाकडे कानाडोळा करण्याची हिम्मंत होत नाही हे काम मोदीनी केले आहे. साखर कारखान्याने अडचणीत आलेले असताना मोदीनी भाव ठरवुन देण्याचा निर्णय घेतला. आजारी कारखान्याना मदतीचा हात देण्याचे काम मोदीनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात परिवर्तन झाले व त्यामुळे तालुक्यात विकासाची कामे मार्गी लावली निधी मिळाला. त्यामुळे कार्यकर्तेनो मतभेद विसरून जावुन शिर्डी मतदारसंघातून खा.लोखंडे ना मोठे मताधिक्य मिळवून द्या असे अवाहन केले.  मेळाव्याचे प्रास्तविक व स्वागत तालुकाध्यक्ष शरदराव चाैधरी यांनी तर आभार युवक अध्यक्ष अक्षय अभाळे यांनी मानले.