“बहिणाबाई चौधरी, सुधा मूर्ती” यांचा युवा पिढीने आदर्श घ्यावा – शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : बहिणाबाई चौधरी, सुधा मूर्ती ह्या स्त्री-पुरुष समानतेच्या जीवंत उदाहरण आहेत व त्यांचा आदर्श युवा पिढीने घेतला पाहिजे. स्त्री-पुरुष समानतेबाबत युवा पिढीने जागरूक असणं फार महत्त्वाचे आहे. वर्तमान तांत्रिक युगात विशेषता मुलींनी सतर्क रहाणे तसेच कायद्यासंदर्भात त्यांना ज्ञान असणे ही काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन विधिज्ञ राजश्री शिंदे यांनी येथे केले.

त्या के. जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्री-पुरुष समानता कायद्यातील तरतुदी’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.

 शिंदे पुढे म्हणाल्या  की, “कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा, संपत्तीत मुलींचा हक्क कायदा, माहिती व तंत्रज्ञान कायदा इत्यादी कायद्यांची माहिती विद्यार्थींनीना असणे गरजेचे आहे.” याप्रसंगी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतांनाच महाविद्यालयात विद्यार्थींनीसाठी राबवले जाणाऱ्या विविध उपक्रमाच्याही माहिती दिली. तसेच महिलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे असेही प्रतिपादित केले.

महिला तक्रार निवारण कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. सुरेखा भिंगारदिवे  यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. तर सदस्य प्रा. नीता शिंदे यांनी आभार व्यक्त केली. प्रा. प्रज्ञा कडू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. वर्षा आहेर,  रजिस्ट्रार  डॉ. अभिजीत नाईकवाडे, प्रा. एस.जी. कोंडा, प्रा. आर.ए. जाधव, प्रा. वृषाली पेटकर, प्रा. पूजा गख्खड,  यांनी विशेष परीश्रम  घेतले.