जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भारदे विद्यालय प्रथम

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय पिंपरणे व साहित्य परिषद संगमनेर आयोजित चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत येथील नानासाहेब भारदे इंग्लिश मीडियम स्कूलमधील ऋग्वेद प्रदीप बोडखे याने प्रथम तर श्रेया प्रदीप काळे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करत सांघिक प्रथम क्रमांकाच्या करंडकावर शाळेची मोहोर उमटविली आहे.

इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात पृथ्वीराज शरद पोटफोडे, चैतन्य वीरेंद्र बैरागी यांनी या गटातील प्रथम क्रमांकाचा करंडक पटकावला, तर अमृता  लव्हाट, जेबा शेख यांनी आठवी ते दहावी गटात अनुक्रमे प्रथम व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त करत या गटातील प्रथम क्रमांकाचा सांघिक करंडक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक निलेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

         भारदे शाळेला प्रथम क्रमांकाचे तीन्ही सांघिक करंडक मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे, शाळा समिती अध्यक्ष हरिश  भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे, मुख्याध्यापिका परवीन काझी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. रमेश भारदे म्हणाले, शाळेचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण बाळासाहेब भारदे यांचे ओजस्वी आणि समर्पक वक्तृत्व ही त्यांची खरी ओळख होती. वाचनाच्या व्यासंगाला प्रभावी वक्तृत्वाची जोड मिळाली तर व्यक्तिमत्व विकसित होते. यावेळी उपप्राचार्य संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक उमेश घेवरीकर, गोकुळ घनवट, सदाशिव काटेकर, रोहिणी बोडखे आदी उपस्थित होते.