मुली देशाचे भविष्य – शफीक सय्यद

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०९ : आज प्रत्येक क्षेत्रात मुलांबरोबर मुली देखील आघाडीवर आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाने लक्षणीय प्रगती केली असून मुली देशाचे भविष्य असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका मुस्लिम विकास समितीचे शफीक सय्यद यांनी केले. 

कोपरगाव येथील तालुका ग्रामीण रुग्णालयात नवजात मुलींच्या जन्माचे स्वागत कोपरगाव तालुका मुस्लीम विकास समितीच्यावतीने रविवारी मुलीबरोबरच त्यांच्या मातांची खणानारळाने ओटी भरून शहीद जवानांच्या वीरपत्नींचा साडी, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा त्यांच्या विकासकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

शफिक भाई सय्यद यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पाच वर्षात मुस्लिम बांधवांसाठी तसेच समाजातील सर्व घटक वर्गासाठी केलेल्या विकास कामांची माहिती देऊन त्या कार्यक्षम महिला आमदार असून कोपरगाव शहर व मतदार संघावर प्रत्येक अडचणीच्या वेळी संजीवनी उद्योग समूह नेहमी सर्वप्रथम मदतीला धावून येतो असे ते म्हणाले.

याप्रसंगी हाजी फकिर महंमद पहिलवान यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. याप्रसंगी माजी नगरसेवक स्वप्नील निखाडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी प्रतोद केशव भवर, खालीकभाई कुरेशी, नसीर सय्यद, मौलाना शमसोदद्दीन, मौलाना निसार, मौलाना हमीद राही, हाजी सद्दाम सय्यद, लियाकत सय्यद, इलियास खाटीक,

मौलाना असीफ, मौलाना असमीन, मौलाना जुबेर, सादिक पठाण, एस.पी पठाण, मजहर सय्यद, अतिक सय्यद, हुसेन सय्यद, शाहरुख खान, अल्ताफ कुरेशी, अकबरभाई शेख, अन्सारभाई शेख, अहमदभाई बेकरीवाले, अन्वर बेगुभाई सय्यद, हबीब पटेल, आरीफभाई, शब्बीर भाई, फारुख शेख, सलमान कुरेशी, इलिआस पठाण, मुक्तार पठाण, यांच्यासह विविध संस्थांचे आजी, माजी पदाधिकारी मुस्लीम कार्यकर्ते आदि उपस्थित होते. शेवटी आयुब मास्टर शेख यांनी आभार मानले.