पंचनाम्याचा नुसता फार्स नको, सरसकट नुकसान भरपाई मिळावी – माजी आमदार घुले

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : शेवगाव तालुक्यासह नजीकच्या नेवासा व पाथर्डी तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरी पेक्षा जास्त पाउस झाल्याने खरीप पिकांसह फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. सोमवारी व मंगळवारी शेवगाव तालुक्यातील विविध मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे शासनाने वरील तिन्ही तालुक्यात तात्काळ ओला  दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे व याबाबत विधान सभेत पाठपुरावा करण्याचे साकडे  माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्य्याकडे सादर केले.

Mypage

          विरोधी पक्ष नेते पवार हे नुकतेच जिल्हा दौऱ्यावर असताना नेवासा तालुक्यातील भानसहिवरे परिसरात आले असता. माजी आमदार डॉ.घुले यांनी शेतक-यांच्या शिस्तमंडळासह त्यांची भेट घेवून गेल्या काही दिवसापासून वरील तिन्ही तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने या तिन्ही तालुक्यातील शेतक-यांच्या खरीप हंगामातील कापूस, तूर, मुंग, सोयाबीन, कांदा, उडीद आदी पिकांसह फळबागा तसेच शेतातील उभ्या उसाच्या नुकसानीबाबत त्यांना माहिती दिली.

tml> Mypage

राज्य शासनाने केवळ पंचनाम्याचा फार्स न करता शेतक-यांच्या नुकसानीबाबत सरसकट नुकसान भरपाई देवून शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी केली असता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या निवेदनानुसार विधान सभेत आवाज उठवून या परिसरातील शेतक-यांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करु असा दिलासा दिला असल्याचे घुले यांनी येथे सांगितले. 

Mypage