‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रशांत सांगडे यांच्या मार्गदर्शना खाली राबविला

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. :  सर्व सामान्यांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या प्रलंबित अडी अडचणी सोडविण्यासाठी थेट त्याच्या दारी जाऊन त्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने सुरु असलेला ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सध्या शेवगाव तालुक्यात तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या मार्गदर्शना खाली युद्ध पातळीवर राबविला जात आहे.

Mypage

त्यासाठी कार्यालयीन कामाच्या वेळे व्यतिरिक्त रात्री देखील गावोगावी त्यांच्या गाठीभेटीचा व्यस्त कार्यक्रम जोमात सुरु आहे. तहसीलदार सांगडे यांनी अमरापूर येथे तसेच माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यात सलग दुसर्‍यांदा प्रथम पारितोषिक मिळविलेल्या आदर्श गाव वाघोली येथे आयुष्यमान भारत योजनेचे शिबीर आयोजित करून रात्रीच कार्ड वाटपाचे काम मार्गी लावले.

Mypage

यावेळी तहसीलदार सांगडे यांचे समवेत प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, महात्मा फुले जन आरोग्य योजना जिल्हा समन्वयक डॉ. मयूर मुथा, डॉ. अनिकेत भालसिंग, महात्मा फुले जन आरोग्य योजना जिल्हाप्रमुख विठ्ठल वांढेकर  होते. 

Mypage

वाघोलीच्या लोकनियुक्त सरपंच सुस्मिता उमेश भालसिंग, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब शिंगटे, मोहन गवळी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुभाष दातीर, दत्तात्रय दातीर, गंगाधर जोगदंड, दादासाहेब जगदाळे, ग्रामसेविका जनाबाई फटाले, ग्रामपंचायत सर्व सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका गवळी, आरोग्य सेविका आशा बडे, आशा सेविका कविता झींजुर्के, पुनम आगलावे, अलका कोरडे,

Mypage

आयुष्मान भारतचे आरोग्य मित्र आकाश वांढेकर, धनंजय गाडगे, अंगणवाडी मदतनीस राजश्री डोळसे, दिव्या आल्हाट, फकिरा आल्हाट व ग्रामस्थ उपस्थित होते. युवक कार्यकर्ते उमेश भालसिंग यांनी प्रास्ताविक केले, सोमेश्वर शेळके यांनी सुत्रसंचलन केले. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जमधडे यांनी आभार मानले. 

Mypage