आम्ही श्रेयवादाचे नाही, तर विकासाचे राजकारण करतो – स्नेहलताताई कोल्हे

Mypage

शिंगणापूर येथे ५६ लाख रुपयांच्या विकासकामांचा कोल्हे यांच्या हस्ते शुभारंभ 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : कोल्हे कुटुंब तीन पिढ्यांपासून समाजकारण व राजकारण करत असून, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांचा समाजकार्याचा वारसा पुढे चालवत त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही वाटचाल करत आहोत. आमची बांधिलकी जनतेशी असून, विरोधकांप्रमाणे आम्ही श्रेयवादाचे नाही तर विकासाचे राजकारण करतो. शिंगणापूर गावासह कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य आहे. यापुढील काळातही मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली.

Mypage

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे ग्रामपंचायतच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेतून संजीवनी गेट येथे रस्ता काँक्रिटीकरण (१० लाख रुपये), गणेशनगर येथे बंदिस्त गटार/पेव्हर ब्लॉक (१० लाख रुपये), ज्ञानेश्वरनगर येथे बंदिस्त गटार करणे (९ लाख रुपये), दत्तनगरमध्ये रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार करणे (१३ लाख रुपये),

Mypage

१५ व्या वित्त आयोगातून स्मशानभूमीला वॉल कंपाऊंड करणे (२ लाख रु.), गणेशनगरमध्ये शाळा परिसरात बंदिस्त गटार करणे (दीड लाख रु.), २८ नं. चारी येथे रस्ता दुरुस्ती (४ लाख ३८ हजार रु.), ग्राम निधीतून स्मशानभूमी खोली दुरुस्ती (१ लाख रु.), गणेशनगरमध्ये शाळा खोली दुरुस्ती (१ लाख रु.), २८ नं. चारी येथे गावांतर्गत रस्ता मुरूमीकरण करणे (२ लाख रु.), संजीवनी गेट येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे (२ लाख रुपये) अशा विविध विकासकामांचा शुभारंभ स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी (९ सप्टेंबर) करण्यात आला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

Mypage

प्रारंभी उपसरपंच रत्नाताई श्याम संवत्सरकर, माजी सरपंच कुसुमताई संवत्सरकर, शिल्पाताई संदीप संवत्सरकर, राजश्रीताई काळे, भगवान संवत्सरकर आदींनी स्नेहलताताई कोल्हे यांचे स्वागत केले. सरपंच डॉ. विजय काळे, माजी सरपंच यादवराव संवत्सरकर, भीमा संवत्सरकर, भाऊसाहेब वाघ, प्रमोद संवत्सरकर आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत संवत्सरकर तर आभार प्रदर्शन अविनाश संवत्सरकर यांनी केले.

Mypage

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचे शिंगणापूर गावावर विशेष प्रेम  होते. शिंगणापूरच्या विकासात कोल्हे कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. कोल्हे कुटुंबीयांचे शिंगणापूर गावाशी आपुलकीचे नाते असून, कोणी कितीही राजकीय आक्रमण केले तरी हे नाते तुटणार नाही. येथील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी नेहमीच कोल्हे कुटुंबीयांना साथ दिली आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवून  यापुढेही कोल्हे कुटुंबीयांना साथ द्यावी. स्व. शंकरराव कोल्हेसाहेब हे आदर्श राजकारणी व असामान्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या भल्यासाठी सदैव विकासाचे राजकारण केले. शेती, पाणी, सर्वसामान्य शेतकरी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.

Mypage

संजीवनी महिला बचत गटात काम करत असताना त्यांचा आदर्श घेऊन मी विधिमंडळात पोहोचले. मी आमदार असताना विधिमंडळात कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रश्न मांडून ते सोडविले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना शासनाकडून कोट्यवधींचा निधी खेचून आणून कोपरगावात नवीन एस. टी. बसस्थानक, पोलिस स्टेशन, नगर परिषद व इतर विविध शासकीय कार्यालयांच्या इमारतींची कामे तसेच मतदारसंघात अनेक विकासकामे केली; पण त्याचा कधीही गवगवा केला नाही. माझ्या कार्यकाळात मतदारसंघात झालेल्या विकासकामांचे श्रेय घेणाऱ्या विरोधकांना गेल्या साडेतीन वर्षांत कोणतेही विकासाचे ठोस काम करता आलेले नाही.

Mypage

आताही ते हे काम मीच मंजूर करवून आणले, असे सांगून न केलेल्या विकासकामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही एक प्रवृत्ती आहे. आपण त्याला अजिबात महत्त्व देत नाही तर जनतेचे प्रश्न सोडविण्यावर आपला भर आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न व विकासकामे मार्गी लावण्यासाठी आजही आपला शासनाकडे पाठपुरावा सुरूच आहे. माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात शिंगणापूर गावात विकासाची अनेक कामे झाली. आगामी काळातही येथील विकासकामासाठी कायम सहकार्य राहील, असेही त्या म्हणाल्या. 

Mypage

यादवराव संवत्सरकर व भाऊसाहेब वाघ म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हेसाहेब शिंगणापूर ही आपली कर्मभूमी असल्याचे सांगत असत. त्यांनी शिंगणापूरच्या विकासासाठी खूप काही केले आहे. त्यांनी आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवले. संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवार संकटाच्या काळात सतत जनतेच्या मदतीला धावून जातो.

बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर ग्रामपंचायतमार्फत गावच्या विकासाची वाटचाल सुरू आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे कोपरगाव तालुक्याचे वाटोळे झाले असून, त्यांच्या गावातील रस्ता व स्मशानभूमीचे कामसुद्धा स्नेहलताताई कोल्हे यांच्या निधीतून झालेले आहे. कोल्हे कुटुंबीयांवर टीका करण्यापूर्वी त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला.

कार्यक्रमास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र लोणारी, राजेंद्र लोणारी, रंगनाथ संवत्सरकर, भाऊलाल कुऱ्हे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन यशवंत संवत्सरकर, पं. स. चे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रदीप जगताप, ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे, दत्तू संवत्सरकर, शेखर कुऱ्हे, संजय तुळसकर, दिगंबर कुऱ्हे, प्रसाद आढाव, प्रशांत आढाव, श्याम संवत्सरकर, बाबासाहेब संवत्सरकर, दिलीप आढाव, नवनाथ संवत्सरकर, जालिंदर गोरख संवत्सरकर, दिलीप चौखंडे, दिनकर मोरे, योगेश महाले,

किशोर सानप, विश्वास जानराव, सुनील भोसले, अजय संवत्सरकर, ज्ञानेश्वर संवत्सरकर, सोमनाथ चिंधुपुरे, अण्णा संवत्सरकर, कृष्णा संवत्सरकर, कैलास येडूबा संवत्सरकर, अशोक वराट, मनोज इंगळे, सतीश निकम, नंदू शुक्ला, दीपक राऊत, रोहित कनगरे, सिद्धार्थ साठे, मंगेश गायकवाड, गणेश राऊत, अमित राजपूत, ओंकार कोल्हे, राहुल सुपेकर, अली पठाण, नानासाहेब निकम, संतोष थोरात, समाधान कुऱ्हे, पंकज कुऱ्हे, मनीष निकम, प्रथमेश इंगळे, अमोल वाघ, भैय्या मुळेकर, संकेत मगर, संतोष सदगीर, शिवा सुपेकर, सचिन पगारे, नितीन जाधव आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.