कोपरगाव मतदार संघाच्या विकास कामांच्या ६ कोटीच्या निविदा प्रसिद्ध – आमदार काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : कोपरगाव मतदार संघाला विकासाच्या वाटेवर आणून मतदार संघाच्या विकासाचा चेहरा मोहरा आ. आशुतोष काळे यांनी बदलवला आहे. त्यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील विविध विकास कामे पूर्ण झाली असून अनेक कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. उर्वरित विकास कामांना देखील लवकरात निधी मिळून हि कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी त्यांचा अविरतपणे पाठपुरावा सुरुच असतो. या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघाच्या विविध विकास कामांच्या ६ कोटीच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

Mypage

चार वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेला सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवून दाखविलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील बहुतांश विकास कामे पूर्ण करून विकासाच्या बाबतीत मतदार संघाला अव्वल स्थानी ठेवले आहे. मतदार संघाच्या विकासाची घौडदौड पुढे सुरु ठेवतांना शिल्लक विकास कामांचा निपटारा करण्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यातून ६ कोटीच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

Mypage

यामध्ये कोपरगाव मतदार संघातील शिंगवे-कोपरगाव-पुणतांबा रोड ते पद्माकर सुराळकर घर रस्ता डांबरीकरण करणे (१४.७७ लक्ष), मौजे वाकडी येथे श्री खंडोबा देवस्थान परिसर सुशोभिकरण करणे (३८.३० लक्ष), धोंडेवाडी पंचवटी हॉटेल ते थेटे वस्ती रस्ता बहादरपूर जवळके रोड १.०० कि.मी. रस्ता डांबरीकरण करणे(१४.८६ लक्ष), डाऊच खुर्द महालक्ष्मी डेअरी ते रावसाहेब पवार घर १.०० कि.मी. रस्ता डांबरीकरण करणे(१४.६० लक्ष), सुरेगाव येथे सामाजिक सभागृह बांधणे (१९.५३ लक्ष), वाकडी श्री स्वामी समर्थ मंदिर ते नारायण खरात घर रस्ता डांबरीकरण करणे (१४.३७ लक्ष), वाकडी श्री संत सावता महाराज मंदिर पेव्हर ब्लॉक बसविणे, (११.५४ लक्ष),

Mypage

पुणतांबा ग्रा. मा. ११५ चांगदेव नगर रेल्वे बोगदा ते गणपती मंदिर १.०० कि. मी. रस्ता डांबरीकरण करणे(१७ लक्ष), बहादराबाद जालिंदर कोल्हे वस्ती ते औताडे घर रस्ता ग्रा. मा.५२(५०.०२लक्ष), शिंगणापूर रा.मा.६५ ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना पेट्रोल पंप मारुती मंदिर ते कर्मचारी वसाहतीपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (२०.०४ लक्ष), देर्डे-कोऱ्हाळे येथील खडकी नदी ते प्र.रा.मा. ८ पर्यंत रस्ता करणे (इजिमा-१) (३०.६१ लक्ष), भोजडे ते दहेगाव बोलका रस्ता करणे, ग्रा.मा. ६३ (३७.४७ लक्ष),

Mypage

रा. मा. ७ ते सुरेगाव मार्ग रस्ता करणे ग्रा. मा. १०० (४६.३५लक्ष), संवत्सर दशरथवाडी ते दहेगाव बोलका मार्ग रस्ता करणे (५३.४७), लक्ष्मणवाडी ते प्रजिमा-०५ ला मिळणारा रस्ता (ग्रा.मा.३३) कि.मी. १/०० ते ४/०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (५३.७२ लक्ष),ब्राम्हणगाव ते तालुका हद्द मार्ग रस्ता करने (ग्रा. मा. ०३) (३८.१६लक्ष), उक्कडगाव ते तालुका हद मार्ग रस्ता-२३ (२३.०६ लक्ष), सुरेगाव गावठाण जवळ सिडी वर्क करणे ग्रा. मा. २८(२०.१३ लक्ष),

Mypage

शहाजापूर शिवाजी काकडे घर ते वर्पे वस्ती ग्रा.मा. १०९ ला मिळणारा रस्ता डांबरीकरण करणे (१०.३२लक्ष), माहेगाव देशमुख प्रजिमा-८५ (मारुती मंदिर) बाबासाहेब पानगव्हाणे घर ते ज्ञानेश्वर खैरनार वस्ती रस्ता डांबरीकरण करणे (३७.९६ लक्ष),ग्रा.मा.५ (वडगाव) दौलत सोनवणे घर ते संजय घर ते १.५०० कि.मी..रस्ता डांबरीकरण करणे (१५.६४ लक्ष), रांजणगाव देशमुख खंडोबा मंदीर ते संदीप गोर्डे घर ०१ कि.मी.रस्ता डांबरीकरण करणे (१८.२२ लक्ष) या कामांचा समावेश आहे.

Mypage

लवकरच या निविदा उघडल्या जावून सर्व तांत्रिक बाबींच्या पूर्तता होऊन काही दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर अनेक वर्षापासून त्रास सहन करणाऱ्या मतदार संघातील वरील गावातील नागरिकांची कायमची सुटका होणार आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. मतदार संघातील अजूनही जे काही विकास कामे नागरिकांकडून सुचविले जातील त्या विकास कामांच्या पूर्ततेसाठी माझा पाठपुरावा यापुढे देखील सुरूच राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Mypage