तालुक्यातील ४४ हजार लाभार्थ्यांना १०० रुपयात मिळणार १ किलो चणादाळ, १ किलो रवा, १ किलो साखर व एक लिटर पामतेल

राज्य सरकारमुळे सर्वसामान्याची दिवाळी होणार गोड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : सध्या राज्यामध्ये अनेक राजकीय भुकंप होत असले तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गरीबांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतल्याने केवळ शंभर रुपयात एक किलो चणादाळ, एक किलो रवा, एक किलो साखर व एक लिटर पामतेल दिवाळी भेट म्हणुन देण्याचे जाहीर केल्याने कोपरगाव तालुक्या तब्बल ४४ हजार ६८ शिधापत्रिका धारकांना त्याचा लाभ घेता येणार असल्याची माहीती कोपरगाव तालुका पुरवठा अधिकारी दिपक भिंगारदिवे यांनी दिली. 

आता महागाईच्या काळात शासनाने रवा, साखर, तेल व दाळ केवळ शंभर रुपयात देत असल्याने गरीबांसाठी हि दिवाळी गोड होणार आहे.

तहसीलदार विजय बोरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिधा वाटपाचेकाम पारदर्शक पद्धतीने करण्यात आले असुन तालुक्यातील ११३ स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य त्या सुचना देवून दिवाळीचे शासकीय किट वेळेत वाटप करण्यासाठी तहसीलदार विजय बोरूडे प्रयत्न करीत आहेत. 

 दरम्यान तालुक्यात तब्बल  ४४ लाख ६८० रुपयाचे तेल, साखर, रवा व चणादाळ अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे.  एका कार्डवर एक किट मिळणार आहे. तालुक्यात अंतोदय  कार्डधारक ६ हजार ७९१ तर प्राधान्य कुटुंब कार्डधारक ३७ हजार २७७  आहेत. तालुक्यात एकुण लाभार्थी कार्ड ४४हजार ६८ आहेत त्यांना राज्य सरकारकडून ४४ लाख ६८० रूपयाचे साहीत्य दिले जाणार आहेत तर तालुक्यातील ११३ स्वस्त धान्य दुकानदारांना प्रत्येक किटच्या पाठीमागे ६ रूपये वाटपाचे पैसे मिळणार असल्याने केवळ दिवाळी शिधा वाटपासाठी २ लाख ६४ हजार  ४८० रुपये शासनाला मोजावे लागणार आहेत अशी माहीती पुरवठा अधिकारी दिपक भिंगारदिवे यांनी दिली.

 करोनाच्या काळात शासनाच्या मोफत धान्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला होता. स्वस्त धान्य दुकानातुन मिळणाऱ्या धान्यावरच अनेकांचे जीवन अवलंबून आहे. 

प्रति महीण्याला लाभार्थींना मिळणारे धान्य नेहमी प्रमाणे मिळणार आहे. दिवाळीसाठी दिलेल्या किट संबधीत लाभार्थीच्या नावाने इतर कोणीही घेणार नाही किंवा दुकानदार काळ्या बाजारात विकणार नाही याची दक्षता महसुल विभागाने घेतली आहे. संबधीत लाभार्थीच्या अंगठ्याशिवाय दिवाळीचे साहित्य कोणालाही घेता येणार नाही. ज्या लाभार्थीने घेतले नसेल त्यांच्या नावाचे साहीत्य शिल्लक राहणार आहे. दिवाळीच्या आगोदर सर्व लाभधारकांना राज्य शासनाची ही दिवाळी भेट पोहच करण्यासाठी संपूर्ण यंञणा सज्ज झाली आहे.