अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पूल व रस्त्यांसाठी ४६.४६ कोटी, तर उपजिल्हा रुग्णालय इमारतीसाठी २८.८४ कोटी रुपये निधीची तरतूद – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : कोपरगाव मतदार संघातील रस्त्याची दुरवस्था दूर करून दळणवळण पूर्व पदावर आणण्यात आ. आशुतोष काळे आ.आशुतोष काळे चार वर्षात यशस्वी झाले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे मोठे सहकार्य लाभले असून त्यांनी पुन्हा एकदा मतदार संघातील रस्त्यांसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ४६.४६ कोटी व १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी देखील २८.८४ कोटी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघातील शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम आणि छोट्या पुलांसाठी निधी मिळावा यासाठी महायुती शासनाकडे प्रस्ताव दाखल केले होते. या मागणीची दखल घेवून महायुती शासनाने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ४६.४६ कोटी निधी दिला आहे. या निधीतून मतदार संघातील प्रकाशा ब्राम्हणवेल सामोदा विंचूर भरवस सावळीविहीर रस्ता (रामा७) वरील चासनळी पूल पोहोच रस्त्याकरिता भूसंपादन व रस्ता सुधारणा करणे (१.५०कोटी), राममा २२२ तोलारखिंड कोतूळ सावरचोळ संगमनेर तळेगांव कोपरगांव उक्कडगांव वैजापूर रस्ता (रामा ६५) किमी ११४/०० ते १२०/०० (शिरसगांव ते उक्कडगांव) मध्ये सुधारणा करणे(५ कोटी), रामा ७ ते धामोरी रवंदे ब्राम्हणगांव येसगांव, पढेगांव, दहेगांव बोलका, धोत्रे, खोपडी रस्ता (प्रजिमा ४) किमी २५/०० ते २८/५०० (बोलकी ते पढेगांव) मध्ये सुधारणा करणे(३.५० कोटी), 

रामा ७ ते धामोरी, रवंदे, ब्राम्हणगांव, येसगांव, पढेगांव, दहेगांव बोलका, धोत्रे, खोपडी रस्ता (प्रजिमा४) किमी ३४/०० ते ३७/०० (दहेगांव बोलका शिवाजीनगर ते लौकी प्रजिमा १३) मध्ये सुधारणा करणे (०३ कोटी), पाथरे बु. लोणी, पिंपरी निर्मळ, चोळकेवाडी, वाकडी, चितळी रस्ता (प्रजिमा ८६) किमी २६/५०० ते ३२/०० (वाकडी ते चितळी) मध्ये सुधारणा करणे (०३कोटी), अहमदनगर, नाशिक जिल्हा हद्द ते रामा ६५ पोहेगांव तालुका हद्द सावळीविहीर रस्ता (प्रजिमा ९८) किमी ४/०० ते ८/५०० (सावळीविहीर तालुका हद्द ते पोहेगांव) मध्ये सुधारणा करणे(०३ कोटी), कोल्हार, राजुरी, वाकडी, रामपूरवाडी, पुणतांबा रस्ता (प्रजिमा ८७) किमी २६/०० ते २८/०० मध्ये सुधारणा करणे(०२ कोटी), 

राममा ८ ते सावळीविहीर प्रजिमा १३ वारी, औरंगाबाद जिल्हा हद्द रस्ता (प्रजिमा २०३) किमी ५/०० ते १०/०० (सडे ते वारी) मध्ये सुधारणा करणे(०५ कोटी), प्रजिमा ४ आंचलगांव, ओगदी, शिरसगांव प्रजिमा १३ रस्ता (प्रजिमा २०४) किमी  ०/०० ते ४/०० (ओगदी ते सावळगांव) मध्ये सुधारणा करणे(०४ कोटी), रामा ७ ते माहेगांव देशमुख रस्ता करणे. (ग्रामा ३०) (१.५० कोटी), घारी येथील घारी ते चांदेकसारे पूल बांधणे (१.८० कोटी), ग्रामा ६३ राहाता, चितळी रोड ते पुणतांबा रस्ता करणे(०२ कोटी),  ब्राम्हणगांव ते तालुका हद्द मार्ग रस्ता करणे. (ग्रामा-३)(५० लक्ष), रांजणगांव देशमुख येथील रामा ६५ ते तालुका हद्द चिंचोली रस्ता करणे. (ग्रामा५८) (५० लक्ष), 

रामा ७ ते सुरेगांव मार्ग रस्ता करणे. (ग्रामा-१००)(६० लक्ष), उक्कडगांव ते तालुका हद्द मार्ग रस्ता करणे. (ग्रामा-२३) (३०लक्ष), मल्हारवाडी, काकडी ते यलमामे वस्ती रस्ता करणे. (इजिमा १४)(५० लक्ष), देर्डे कोऱ्हाळे येथील खडकी नदी ते प्ररामा १२ पर्यंत रस्ता करणे. (इजीमा१) (४० लक्ष), संवत्सर दशरथवाडी ते दहेगांव बोलका मार्ग रस्ता करणे (ग्रामा३५) (७०लक्ष), भोजडे ते दहेगांव बोलका रस्ता करणे(ग्रामा३६)(५०लक्ष), प्रजीमा ५ पासून मनाई वस्ती ते औद्योगिक वसाहत रस्ता (०२ कोटी), लक्ष्मीवाडी ते प्रजीमा ५ ला मिळणारा रस्ता करणे (७० लक्ष),

रामा ७ धामोरी रवंदे, ब्राम्हणगाव, येसगाव, करंजी, पढेगाव, दहेगाव, बोलका, धोत्रे, खोपडी जिल्हा हद्द रस्ता (प्रजीमा ०४) १/२० मध्ये गोई नदीवर पोहोच मार्गासह पूलाचे काम करणे (४.४६ कोटी) असा एकूण ४६.४६ कोटीचा निधी रस्ते व पुलांसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.

आरोग्य व्यवस्था किती कमकुवत होती हे वैश्विक कोरोना महामारीने दाखवून दिल्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासाबरोबरच आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. जिल्हा रुग्णालय कोपरगाव मतदार संघापासून जवळपास १०० किलोमीटर दूरवर असून जिल्ह्याच्या उत्तर भागात एकही उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून १०० बेडच्या उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा मिळवून २८.८४ कोटी निधी मंजूर करून घेतला होता. त्या निधीची देखील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तरतूद करण्यात आल्यामुळे कोपरगाव शहरात लवकरच सर्व सुविधायुक्त असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या कामास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.