कोल्हे कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर

कोपरगांव प्रतिनिधी, दि.२१ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ६१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संचालक सतिष आव्हाड व  वैशाली आव्हाड या उभयतांच्या हस्ते, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे, भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयादशमीच्या मुहुर्तावर मंगळवारी (२४ ऑक्टोंबर) सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.

अशी माहिती उपाध्यक्ष मनेष गाडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, व साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी दिली. तरी सर्व उस उत्पादक सभासद शेतकरी बांधवांनी या बॉयलर पुजेसाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.