भारतीय सैन्य दलात निवडीबददल मोर्विस ग्रामस्थांनी केला सत्कार

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : भारतीय सैन्याची प्रतिमा जगात उंचावलेली असुन भारतमातेच्या रक्षणार्थं असंख्य सैनिक डोळयात तेल घालून आपले कर्तव्य बजावत असतात तालुक्यातील मोर्विससह अन्य गावातील आठ सैनिकांची भारतीय सैन्यात निवड झाल्याबददल त्यांचा मोर्विस ग्रामस्थांच्यावतीने गुरूवारी सत्कार करण्यांत आला. अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव होते. 

            याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी सत्कार करून सदिच्छा व्यक्त करत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील मुला मुलींना सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण मिळावे यासाठी संजीवनी प्री कॅडेट ट्रेनिंग सेंटर व संजीवनी सैनिकी शाळा सुरू करून त्याबाबतचे ज्ञान दिले आहे. त्याचाच परिपाक म्हणून संजीवनी सैनिकी स्कुलचा मयुर गोरक्षनाथ कोकाटे हा विद्यार्थी भारतीय सैन्यदलात निवडला गेल्याचे ते म्हणाले.

             याप्रसंगी सर्वश्री. मयुर गोरक्षनाथ कोकाटे, साईनाथ भोसले, विशाल मोहिते, योगेश आहेर, रोहित घोटेकर, समाधान शिंदे, गणेश पवार, आकाश फापाळे व शुभम ढोमसे यांच्यासह त्यांच्या मातापित्याचा मोर्विस ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गटविकास सचिन सुर्यवंशी, संजीवनी सैनिकी स्कुलचे क्रीडा मार्गदर्शक सुनिल कुटे,

नाशिकचे माजी सैनिक भरत जाधव, नाशिक अग्निशमनचे संजय कुळे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक मनिष गाडे, सरपंच सविता गणेश पारखे, शरद वाघ संतोष सरडे, प्रभाकर पारखे, अनिल साबळे, दशरथ भवर यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, युवक, महिला, कार्यकर्ते, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.