वाहतुकीचे नियम पाळा, अन्यथा कारवाई – रोशनी डांगे

श्रीगणेश शैक्षणिक संकुलात रस्ता सुरक्षा अभियान संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्याबरोबरच रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतो.श्री गणेश शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतुकीचे नियम व त्यावरील उपाय तसेच वाहतुकीचे नियम पाळा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती श्रीरामपूर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रोशनी मधुकर डांगे यांनी दिली.

  यावेळी श्रीरामपूरचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रोहित भागिनाथ पवार, पांडुरंग रमेश सांगळे , श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे,रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल ,गणेश कुऱ्हाडे,प्राचार्य रियाज शेख,रामनाथ पाचोरे, पंकज खंडांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.बापू पुणेकर हे उपस्थित होते.यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात माहिती तसेच अपघातातून बचाव करण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी यासंबंधी इयत्ता ८ ते १२ वी वर्गाच्या विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली.

                    सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रोहित पवार म्हणाले कि, अपघातापासून बचाव करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.हेल्मेट चा वापर, सिट बेल्टचे महत्व, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, वेगावर नियंत्रण अशा अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा चे महत्व पटवून देण्यासाठी शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

          केवळ वाहतुकीच्या नियमांची कठोर अंबलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश नसून समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. असे मत प्रा. विजय शेटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सुपेकर यांनी तर आभार रियाज शेख यांनी मानले.