डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘रक्तदान शिबिर’ स्तुत्य उपक्रम – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : रक्तदानामुळे अनेका रुग्णांना जीवनदान मिळते. मोठ्या सर्जरींमध्ये किंवा अपघात झाल्यावर निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. मात्र करोना महामारीच्या काळात फारसे रक्तदाते पुढे येत नव्हते त्यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा रक्तपेढीमध्ये जाणवत होता आणि आजही परिस्थिती सुधारलेली नसून रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतच आहे.या परिस्थितीची जाणीव ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान उत्सव कमिटीने राबविलेला ‘रक्तदान शिबीर’ स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ.आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान उत्सव कमिटी व संजीवनी रक्तपेढी कोपरगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. समाजातील अनेक व्यक्तींना हवे असलेल्या रक्तगटाचे रक्त वेळेवर मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू होतात. त्यामुळे राबविण्यात आलेला रक्तदान उपक्रम कौतुकास्पद असून त्यामुळे कित्येक लोकांचे जीव वाचविण्यात मदत होणार आहे. यापुढील काळात देखील अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, श्रीराम राजेभोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकरराव दंडवते, माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब, माजी उपसभापती वाल्मिकआप्पा कोळपे, माजी पोलीस अधीक्षक के.पी.रोकडे,संजीवनी ब्लड बँकेच्या संचालिका डॉ.सौ. निता पाटील सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर, सदस्य डॉ. आय.के. सय्यद, सौ. सविता लोंढे, बन्सी निकम, सुनील कोळपे, गणेश सुपनर,भरत मेहेरखांब, कोळगाव थडीच्या सरपंच सौ.मिनल गवळी, मोहन गायकवाड, दादासाहेब जगताप,

अंबादास मेहेरखांब, सुंदर कोळपे, अरुण लोंढे, राहुल निकम, राहुल बनकर, जिगर निकम, रवी डोलारे, साळवे, वैभव वावीकर, सागर गोरे, महेश निकम, अविनाश काळे, मंगेश औताडे डॉ. दिपक खरे, राजेंद्र मेहेरखांब, बाळासाहेब मेहेरखांब, उत्तम मेहेरखांब, कुमार त्रिभुवन, सुनील मोकळ, रमेश निकम, आम्रपाली मेहेरखांब, उज्वला निकम, जयंती उत्सव कमिटी सर्व सदस्य, उपासक, उपासिका आणि रक्तदाते व संजीवनी ब्लड बॅंकेचे सर्व डॉक्टर व त्यांचे सहकारी इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.