शेवगाव तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी सरपंच पदासाठी ३८ तर सदस्य पदासाठी १०८ उमेदवार

शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ :  शेवगाव तालुक्यात पार पडणाऱ्या १२ ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणूकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज सरपंच पदासाठी ३८ तर ४० प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांच्या १०८ जागांसाठी २९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य आजमावणार आहेत.

     तालुक्यात पार पडणाऱ्या १२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी सरपंच पदाची निवड  थेट जनतेतून होत असल्याने या  निवडणुका मोठया चूरशीच्या होणार आहेत हे आता स्पष्ट झाले आहे.

      तालुक्यात अमरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वाधिक ७ तर तालुक्यातील खामगाव, जोहरापूर, सुलतानपूर, वाघोली व रावतळे कुरुड्गाव अशा एकूण ५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज राहिल्याने येथे दुरंगी लढती होणार आहेत. तर दहीगावने भायगाव, खानापूर, ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी तीन उमेदवारी अर्ज असल्याने येथे तिरंगी लढती, याशिवाय आखेगाव येथे सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी चौरंगी लढत रंगणार आहे.
      ग्रामपंचायत सदस्यासाठी जोहरापूर येथे सर्वाधिक ४२ उमेदवार निवडणुकीच्या मैदनात आहेत.      

      तालुक्यातील दहीगावने ग्रामपंचायतीची बहूधा बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा यावेळी खंडित झाली असली तरी येथील ग्राम पंचायत सदस्याच्या १५  पैकी ७ जागा बीनविरोध झाल्या आहेत. त्यात शांताबाई जगन्नाथ मोरे, रुख्मिणी संजय लिंबोरे, मीरा बबन पवार, दिलदार जमादार शेख, राणी विकास गजभिव, सुरेश विश्वनाथ घाणमोडे, संदीप बहिरनाथ गुंजाळ,या ७ जणांचा समावेश आहे.

या सातही जागा घुले गटाने बिनविरोध पटकावून ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम असल्याचे  स्पष्ट केले आहे. सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधून सारिका रामदास वाघमारे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्या देखील बिनविरोध विजयी झाल्याचे नंतर जाहीर होणार आहे.

         सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ग्रामपंचायत निहाय उमेदवार असे–
खामगाव – (२) विद्या अरुण बडधे, उषा सुभाष बडधे, जोहरापूर _ (२) स्नेहल रोहन लांडे, जयश्री शिवाजी खेडकर .
सुलतानपूर – (२) सविता विजय फलके, संध्या सुरेश काते. वाघोली –( २ )सुश्मिता उमेश भालसिंग व निर्मला प्रकाश वांढेकर
रावतळे = ( २ )छाया पांडुरंगा  आवटी व चंद्रकला कल्याण कवडे. दहीगाव ने – (३) विमल अंबादास सातपुते, सुनिता देवदान कांबळे, शिला तुळशीराम खंडागळे.

प्रभूवाडगाव – (३) ज्ञानदेव निवृत्ती घोडेराव, संजय जगन्नाथ शिंदे, प्रयागा गुलाब अंगरखे. भायगाव -(३) मंगल प्रल्हाद आढाव, मनीषा राजेंद्र आढाव, पुष्पा आण्णासाहेब दुकळे. खानापूर ( ३ )उषा गणेश थोरात ,दुर्गा नवनाथ थोरात व शितल मंगेश थोरात आखेगाव = (४) स्वाती श्रीकांत शिंदाडे, आयोद्धा शंकर काटे, सोनाली भागीनाथ खर्चन, जयश्री चंद्रकांत काटे,
रांजणी _ (५) भगवान भानुदास चव्हाण, राम विष्णू शिदोरे, आसाराम नामदेव नऱ्हे, काकासाहेब मुरलीधर घुले, विकास आबासाहेब थोरात. अमरापूर _ (७) धनंजय दिलीप खैरे , आशाबाई बाबासाहेब गरड, भाऊसाहेब गायकवाड, बाळासाहेब नारायण चौधरी, मनीषा राजेद्र पोटफोडे, अरुण भगवान बोरुडे, चांगदेव प्रेमचंद भूकन,

      ग्रामपंचायत सदस्य पदासाठी गाव निहाय उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे – कंसात प्रभाग व सदस्य पदांच्या जागांची संख्या जोहरापूर – ४२ (३/९), खामगाव १६ (३/७), सुलतानपूर १६(३/८), दहीगाव ने २४(३/८), प्रभूवाडगाव १९(३/९), वाघोली ३१(३/९), भायगाव २०(३/९), आखेगाव ३४(३/११), रावतळे कुरुडगाव १८(३/९), खानापूर २१(३/९), रांजणी २३(३/९), अमरापूर ३२ (४/११).