हर्षदा काकडे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : लाडजळगाव गटातील कामांचा मोठा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला. या भागातील गुंडगिरी, खोटे गुन्हे यावर आळा घालण्याचे काम केले. गोरगरीब जनतेच्या कामा मुळेच पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार मी आपल्या चरणी अर्पण करते. हा सन्मान माझा नसून आपल्या सर्वांचा असल्याचे प्रतिक्रीया जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांनी व्यक्त केली आहे.

Mypage

      महिला व बालकल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाचा “राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” मिळाल्याबद्दल बोधेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने काकडे यांचा बोधेगावी नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.

Mypage

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्मानराव घोरतळे  होते. यावेळी डॉ.प्रकाश घनवट, प्रकाश भोसले, भाऊसाहेब घोरतळे, राजू पातकळ, विकास घोरतळे, माणिक गर्जे, ज्ञानदेव घोरतळे, पिनू कापसे, लक्ष्मण पातकळ, भाऊसाहेब मासाळ, भागवत भोसले, ज्ञानेश्वर शेटे, वंचितच्या सौ.संगीताताई  ढवळे, बन्नूभाई शेख, अॅड. कार्तिक कमाने, परमेश्वर झांबरे उपस्थित होते.

Mypage

    काकडे म्हणाल्या, या भागातील मुले शिकावित म्हणून काही कोर्सेस आणण्याचा अॅड.शिवाजीराव काकडे यांचा प्रयत्न  आहे. येथे पिण्याचे पाण्याची सोय नाही. धरण उशाला असूनही आपली ही अवस्था आहे.  लोकप्रतिनिधींना पूर्व भागात विकासकामे करण्याची इच्छा नाही. त्यामुळे तालुक्याचे भविष्य जनतेच्या हातात आहे त्यांनी आता ते कुणाकडे द्यायचे ते ठरवले पाहिजे.

Mypage

       काकडे यांची गावातून सवाद्य मिरवणुक काढून श्री.साध्वी बन्नोमा चरणी चादर अर्पण करण्यात आली. यावेळी विविध संघटनांच्या वतीने  त्यांचा सन्मान करण्यात आला. ईश्वर वाबळे यांनी सूत्रसंचलन तर माणिक गर्जे यांनी प्रास्ताविक केले, तर भागवत भोसले यांनी आभार मानले. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *