वैभवशाली कोपरगाव निर्मितीसाठी व्यापारी बांधवांच्या सहकार्याची आवश्यकता -आमदार काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : कोपरगाव शहरासह मतदार संघाचा विकास साधण्यासाठी मतदार संघाच्या नागरिकांना अपेक्षित असलेला विकास चार वर्षात साधला आहे. आपणा सर्वाना मिळून वैभवशाली कोपरगावची निर्मिती करायची असून त्यासाठी यापुढील काळात देखील कोपरगावकरांसह व्यापारी बांधवांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

Mypage

कोपरगाव तालुक्यातील व्यापारी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तसेच शहराच्या विकासासाठी कोपरगावकरांचे व व्यापारी बांधवांचे सहकार्य लाभले आहे त्यामुळे विकास साधण्यात मोठी मदत झाली आहे. व्यापारी बांधवांना येणाऱ्या अडचणी सोडविणे माझी जबाबदारी असून तुमचे सर्व प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

Mypage

वैभवशाली कोपरगावच्या निर्मितीकडे वाटचाल करीत असतांना कोपरगाव शहराच्या भविष्यातील विकासाबाबत माहिती देतांना आ. आशुतोष काळे यांनी सांगितले की, के.बी.पी. महाविद्यालयाचे मैदानावर होणाऱ्या ३८ कोटीच्या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. कोपरगाव बस स्थानकाच्या जागेत व्यापारी संकुल मंजूर झालेले असून तसेच कोपरगाव नगरपरिषदेच्या दोन व्यापारी संकुल यांच्या निविदा देखील लवकरच प्रसिद्ध होणार आहेत.

Mypage

कोपरगाव शहराचा विकासाच्या बाबतीत अमुलाग्र बदल झाला असून पाणी प्रश्न देखील लवकरच सुटणार असून विकासाच्या बाबतीत कोपरगावची वाटचाल विकसित शहराच्या दिशेने सुरु आहे. विकासात्मक बदल होवून कोपरगाव बदलत आहे. १३१.२४ कोटीची योजना पूर्णत्वाकडे वेगाने जात आहे व या पाणी योजनेसाठी कोपरगाव नगरपालिकेला द्यावी लागणारी १५ टक्के हिश्याची २० कोटी रक्कम महायुती शासनाकडून मिळविणाऱ्या आ.आशुतोष काळे यांचा व्यापारी महासंघाचे वतीने याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

नदी संवर्धनचा १८ कोटीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. कोपरगाव शहर सुशोभीकरणासाठी यापूर्वी देखील कोट्यावधी निधी दिला असून अधिकचा निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. त्या माध्यमातून येत्या काही महिन्यात विकसित कोपरगावची संकल्पना आपली सत्यात उतरणार आहे. त्यासाठी कोपरगावकरांबरोबरच व्यापारी बांधवांनी कोपरगावच्या विविध विकास कामांसाठी आपले मार्गदर्शन व सहकार्य असेच अबाधित ठेवावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

Mypage

या बैठकीसाठी तहसीलदार संदीपकुमार भोसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, तुलसीदास खुबाणी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, सुधीर डागा, अजित लोहाडे, राजेंद्र बंब, चंद्रशेखर कुलथे, प्रदीप  साखरे, प्रणव वाणी, हर्षल कृष्णाणी, निलेश चुडीवाल, अनुप पटेल, अमोल डागा, शाम

Mypage

उपाध्ये, प्रीतम बंब, नारायण अग्रवाल, शैलेश ठोळे, देवेश बजाज, नीरज गोधा, निलेश वाणी, पियुष पापडीवाल, निलेश काले, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, राजेंद्र आभाळे, नारायण लांडगे, योगेश वाणी, विकास बेंद्रे, अमोल आढाव, प्रथमेश वाणी आदींसह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Mypage