शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : येथील नेवासे रस्त्यावरील गुंफा गावाच्या दत्तपाटी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जणाचा जागेवर तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोज शामराव खरड (वय २६) व विशाल मच्छिंद्र फाटके ( वय२१) रा. देवटाकळी असे मृतांची नांवे आहेत.
मोटरसायकल क्रमांक एम एच १६ डी डी ४५९६ या गाडीवरून शेवगाव कडे जात असताना, रात्री दहाच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये मनोज खरड याचा जागेवर मुत्यु झाला. तर बक्तरपुर येथील विशाल फाटके या जखमीला नागरिकांनी उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल केले होते. मात्र, उपचार दरम्यान त्याचाही रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे देवटाकळी व बक्तरपुर गावावर शोककळा पसरली. पोलीसात अकस्मात गुन्हाची नोंद करण्यात आली. गंगामाई साखर कारखान्याला लागलेली आग बघण्यासाठी ते चालले होते असे त्यांच्या गावातून सांगण्यात आले आहे.