भाषा टिकली तर संस्कृती टिकेल – जाधव

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : ज्ञानेश्वर माऊलीनी मराठी रूजविली, छत्रपती शिवरायांनी परकीय आक्रमणात तिचं संरक्षण करून वाचवली, तर संतांनी आपल्या भजन, कीर्तन प्रवचन,भारूड,ओव्या यातून मायमराठीला समृध्द केले. मराठी लेखक, कवी, नाटककार यांनी तिला मोठे केले अशा भाषेचा वारसा व संस्कृती टिकली पाहिजे. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल असे प्रतिपादन कैलास जाधव यांनी केले.

        तालुक्यातील श्री.गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाने येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य रमेश लांडे  होते.  यावेळी प्रांजली खैरे, सिध्दी आरेकर, संस्कृती मुटकुळे, प्रतिक्षा वाणी, आहेर श्रावणी, सिध्दी कळमकर, पानसरे सायली, वैष्णवी औटी या विद्यार्थ्यांनी भाषणे झाली.

निशा तळेकरने महाराष्ट गीत गर्जा महाराष्ट्र माझा, समृध्दी दिवटे हीने माय मराठी कविता, बल सागर भारत होवो हे गीत सुप्रिया थोरात व गंगुबाई दिंडे यांनी तर आई मायेचा सागर भारती खर्डे हिने गायले. तसेच म्हणी, उखाणे, सुविचार, अभंग असा भरगच्च कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.