घरबांधणीसाठी पाच लाखाची मागणी, जीवे मारण्याची धमकी

पत्नीची पती विरुद्ध शेवगाव पोलिसात तक्रार

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : हाणमार करून मानसिक त्रास देत  घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करणाऱ्या, अन्यथा जीवेवारण्याची धमकी देणाऱ्या पतीविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात पत्नीने तक्रार दाखल केली आहे.

याबाबत माहिती अशी की, चापडगाव येथील जरीना सय्यद ( वय २५ ) यांचा विवाह बीड येथील रिजवान हज्जु सय्यद (वय ३० ) यांच्याशी चापडगाव ता.शेवगाव येथे दि.११जून २०२१ रोजी झाला होता. तेव्हापासुन लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी जरीना हीस तुला काम येत नाही, तुला स्वयंपाक येत नाही अशी कारणे दाखवुन शारिरीक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

जरीना यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की, मला वेळोवेळी सासु ,मीना परवीन हज्जु सय्यद, सासरे हज्जु सय्यद, दीर रेहान हज्जु सय्यद, यांनी उपाशी पोटी ठेवुन रात्रीअपरात्री घराच्या बाहेर काढले. तसेच पतीने घर बांधण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे नाही आणले तर तुझा कायमचा काटा काढून टाकू असे तक्रारीत म्हंटले आहे.

याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम ५०४, ५०६ नुसार तक्रार दाखल करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किरण टेकाळे तपास करत आहेत.