बालमटाकळी ते शिर्डी साईबाबा पालखीचे प्रस्थान

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील बालमटाकळीच्या ओमसाई सामाजिक प्रतिष्ठान आयोजित बालमटाकळी ते शिर्डी साई बाबा पायी पालखीचे आज मंगळवारी ( दि २८ )मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले.

     सकाळी १० वाजता श्रीराम मंदिरापासून  ग्रामपंचायत सदस्य धनंजय देशमुख व स्मिताताई देशमुख, प्रतिष्ठानचे प्रमुख नारायणराव आंदूरे ,उपाध्यक्ष सोपान कडूळे यांच्या हस्ते पालखी पुजन होऊन जेष्ठ नेते सुदामराव शिंदे यांच्या हस्ते पालखीचे प्रस्थान करण्यात आले . यावेळी  फटाक्याची आतषबाजी करत व सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.  पालखी मार्ग सडा, रांगोळीने सजला होता. ठिकठिकाणी पालखी पुजा, महंत पुजा करण्यात आली.

पालखी विसाव्यासाठी बोधेगाव येथील साईधाम मंदिरात  आल्यानंतर तेथे  शिवरंग उद्योग समूहाचे संस्थापक, अध्यक्ष तथा सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयुरराजे वैद्य तसेच जयशाली वैद्य यांच्या हस्ते मध्यान आरती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा साईशाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाप्रसाद घेऊन पालखी सोहळा मार्गस्थ झाला. 

      यावेळी बालमटाकळी सेवा संस्थेचे चेअरमन हरीश्चद्रराजे घाडगे,  बळीराम दरेकर, विष्णू घाडगे, ज्ञानेश्वर कडूळे, गणेश गाडेकर, भरत गांडूळे, ओमकार आंदुरे, कृष्णा आंदुरे, अनिल परदेशी, बाबासाहेब धाकतोडे, पांडुरंग शिंदे, नागुराव गाडेकर, भागवत आंदुरे, सतीश वैद्य, सागर वैद्य, जमीर शेख, दादासाहेब मोटे, रामराव बर्गे, इसाक शेख यांच्यासह साईभक्त, व महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.