शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेळोवेळी विविध स्पर्धामध्ये आपले प्राविण्य दाखविले त्या गुणवंतांचा नुकताच सन्मान करण्यात आला आहे. साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प विभागस्तर द्वितीय क्रमांक अथर्व काकडे, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक करंडक अथर्व मोरे, तेजस्विनी थोरात, चारवी बाफना, वेद मोरे, आरोही शिंदे,
विभागस्तरीय संस्कृत सुभाषित पठण स्पर्धा प्रथम क्रमांक ईश्वरी जगदाळे, तेजस्विनी थोरात, रियांश जाधव, भार्गव देशपांडे, श्रुती थोटे, श्रुती सुसे, करण देवकर,
विज्ञान स्पर्धा जिल्हा गुणवत्ता प्राप्त आराध्या मुंदाणकर तसेच तालुका गणित विज्ञान प्रदर्शन तृतीय क्रमांक किरण बाविस्कर, ईकरा काझी या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे, शाळा समितीचे अध्यक्ष हरीश भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे उपप्राचार्य, पर्यवेक्षक गोकुळ घनवट ,उमेश घेवरीकर, सदाशिव काटेकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना हरीश भारदे म्हणाले, शालेय अध्यापनासोबत विविध संस्कार उपक्रम व सहशालेय स्पर्धेतून गुणवंत विद्यार्थी घडवणे हेच संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. गुणवत्ता हीच शाळेची खरी ओळख असून ती टिकवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे हार्दिक अभिनंदन.