हर्षा बनसोडेने भारताच्या वेशभूषा व संस्कृतीचं केलं अनोखं प्रदर्शन
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगावची लेक, प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे व कल्याणी बनसोडे यांची कन्या कु. हर्षा शैलेंद्र बनसोडे हिने सातासमुद्रापार जावून आपल्या देशाची वेशभुषा व संस्कृतीचे अनोखे प्रदर्शन करीत जगातील तब्बल ४० देशातील प्रतिनिधींना मागे सारत विजेतेपद पटकावल्याने देशाससह राज्याची व समस्त कोपरगावकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
सातासमुद्रापार आपल्या कला कौशल्याचा डंका वाजवणारी हर्षा बनसोडे थायलंड येथील स्पर्धा मध्ये बेस्ट टॅलेंट, अॅवार्ड, क्विन ऑफ हार्टससह वेशभूषा प्रदर्शन व ऐतिहासिक कला संस्कृतिचा वारसा दर्शविण्यात विजेती ठरली आहे. एकाच वेळी तीन बहुमान मिळवणारी मिस हेरिटेज इंडिया विजेती हर्षा आता सातासमुद्रापार जागतीक पातळीची विजेती ठरली आहे.
कोपरगाव येथील शालेय शिक्षण पुर्ण करुन पुण्यामध्ये पुढील शिक्षणाचे धडे गिरवत असताना हर्षा बनसोडे तिच्यातील बुध्दीमत्ता व कला संस्कृतीवरचा असलेला प्रभाव पाहुन हर्षाची निवड करण्यात आली. जगातील ४० देशातील महीला प्रतिनिधीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व हर्षा बनसोडे हिने केले.
पुण्यातील मृणाल एंटरटेनमेंट मिस हेरिटेज इंडिया विजेती असलेली हर्षा बनसोडे तसेच मिसेस विजेत्या हिमानी अग्रवाल या दोघींनी भारताचे प्रतिनिधित्व थायलंड येथील बॅंकाॅक येथे जागतीक पातळीवर इंप्लामेंट या कंपनी द्वारे आपापल्या देशातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या वेशभूषेचे प्रदर्शन साजरा करण्याच्या स्पर्धाचे आयोजन ९ ते १८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत दहा दिवस आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत हर्षाने विविध फेऱ्यांमध्ये आपली कलागुण सादर करुन देशाचे उत्तम प्रतिनिधीत्व केलं.
या स्पर्धेत भारतातर्फे कु. हर्षा बनसोडे हि मिस तर हिमानी अग्रवाल हि मिसेस म्हणुन प्रतिनिधी केले. या स्पर्धामध्ये कु. हर्षा शैलेंद्र बनसोडे हिने तृतिय विजेतपदास इतर दोन बहुमान मिळवल्याने भारताचे नाव सातासमुद्रापार कोरले आहे. मराठमोळ्या कोपरगावच्या हर्षा बनसोडे हिच्या कार्यकर्तृत्वाचा भारतील तामाम नागरीकासह समस्त कोपरगावकरांना सार्थ अभिमान वाटतोय.
हर्षाच्या विजया बद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वर्षाला कोपरगाव येथील संजीवनी अकॅडमीचे विशेष सहकार्य लाभले तसेच तिचे वडील प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे, आई कल्याणी बनसोडे, अनिल गिड्डे, फोटोग्राफर अविनाश निकम, यांच्यासह मृणाल गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कु. हर्षा बनसोडेने हिच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.