स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांना २ कोटींचे कर्जवितरण 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९: गोरगरिबांच्या मदतीला सतत धावून जाणाऱ्या, बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार, कार्यकुशल व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, भाजपच्या लढाऊ नेत्या तथा संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या संस्थापक स्नेहलता कोल्हे यांचा वाढदिवस संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेतर्फे कोपरगाव मतदारसंघातील महिला स्वयंसहायता बचत गटांना २ कोटींचे कर्जवाटप करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

Mypage

रविवारी (८ऑक्टोबर) कोपरगाव शहरातील कलश लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते मतदारसंघातील महिला स्वयंसहायता बचत गटांना २ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले. प्रारंभी महिला बचत गटांच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी स्नेहलता कोल्हे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प.पू. सरला यांनी स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार करून त्यांना प्रेमपूर्वक आशीर्वाद दिले.  

tml> Mypage

कार्यक्रमास संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे, संजीवनी गारमेंटच्या अध्यक्षा मोनिका पराग संधान, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली आढाव, माजी नगरसेविका विद्या सोनवणे, शिल्पा रोहमारे, दीपा गिरमे, अनिता साळवे, सुवर्णा सोनवणे, हर्षादा कांबळे, दीपक साळुंखे, इलियास खाटिक आदींसह विविध महिला बचत गटांच्या पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्या व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Mypage

या वेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, महिला बचत गटामुळे माझी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी कार्य करत असताना माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे, श्रीमती सिंधु (माई) कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कुटुंबीयांच्या प्रोत्साहन व पाठबळामुळे मी राजकारणात आले.

Mypage

माझ्या यशात माझे कुटुंबीय, जनता व महिला बचत गटांचा मोठा वाटा आहे. आमदार असताना मी कोपरगाव मतदारसंघातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्या विकासाचे प्रश्न सोडवले. जनतेच्या पाठिंब्यामुळे मी कोपरगाव मतदारसंघात कोट्यवधीची अनेक विकास कामे केली. कोल्हे कुटुंबाचा नि:स्वार्थी समाजसेवेचा वारसा पुढे चालवत असताना गोरगरिबांचे अश्रू पुसून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे व्रत मी स्वीकारले आहे.

Mypage

महिला आणि महिलांचे प्रश्न हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कष्टकरी महिला, शेतकरी, दीन-दलित व समाजातील वंचित, शोषित लोकांच्या उन्नतीसाठी व महिला सक्षमीकरणासाठी मी स्वत:ला वाहून घेतले असून, शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरूच राहील. जीवन सुंदर आहे. जीवनात तुम्हाला कटू अनुभव येतील, संकटे येतील; पण डगमगू नका, प्रयत्न करत रहा. तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. कोपरगाव मतदारसंघातील महिलांचे, बचत गटांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण यापुढेही संघर्ष करत राहू, असे अभिवचन त्यांनी दिले.

Mypage

स्वयंसहाय्यता बचत गट हे केवळ तळागाळातील महिलांचे सक्षमीकरण करत नाहीत तर ते सामाजिक, भावनिक सौहार्द पसरवतात. आज महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा मागे नाहीत. राष्ट्रपती, केंद्रीय अर्थमंत्री अशा अनेक उच्च पदांवर तसेच प्रशासनात महिला सक्षमतेने कार्यरत आहेत. सामाजिक, राजकीय, अर्थकारण, उद्योग, क्रीडा, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महिला नेत्रदीपक कामगिरी बजावत आहेत.

Mypage

त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदारी त्या चोख पार पाडत आहेत, त्याचे समाधान वाटते. पुरुषांनी महिलांच्या विचाराचा सन्मान करावा. महिला बचत गटांनी महिलांना उद्योगव्यवसायासाठी अर्थसहाय्य करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी कार्य करावे. त्यांना सदैव सर्वतोपरी सहकार्य करू, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, स्नेहलता कोल्हे यांनी वाढदिवसानिमित्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरीजी महाराज व अन्य संत, महंतांचे संतपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

Mypage