शेवगावकर दीप संध्या संगीत मैफिलीत मंत्रमुग्ध

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ : सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत व सुफी गायक, नगरच्या नादब्रह्म संगीतालयाचे संचालक पवन नाईक यांच्या मराठी, हिंदी, पंजाबी सुमधुर भावगीतांच्या संगीत मैफिलीने शेवगावकर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. नाईक यांनी सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी यांची सुमधुर भावगीते, कव्वाली, लावणी, पंजाबी गीते, दमादम मस्त कलंदर अशा संमिश्र गीत मैफिलीने श्रोत्यांच्या उत्स्फूर्त टाळ्यांची दाद मिळवली.

Mypage

शेवगाव रोटरी क्लबच्या वतीने दीपावली उत्सवानिमित्त मागील सलग नऊ वर्ष दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी शेवगावकर रसिक श्रोत्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून दीप संध्या गाणी तुमची आमची या दर्जेदार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

tml> Mypage

कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक माजी आमदार चंद्रशेखर घुले, सहप्रायोजक रेणुका माता मल्टी स्टेट्सचे ज्येष्ठ अर्थ तज्ञ डॉ. प्रशांत भालेराव, लाहोटी ज्वेलर्स, संगमेश्वर सिरॅमिक, साई सिरॅमिक, राजलक्ष्मी हॉटेल, अंजूम ग्रुप व विशाल असोसिएट्स यांनी कार्यक्रमासाठी विशेष अर्थसहाय्य केले. दीप संध्या या कार्यक्रमामुळे शेवगावकरांना अनोखी संगीतमय दिवाळी भेट मिळाली.

Mypage

माजी आमदार घुले यांनी उत्तम कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजकाचे कौतुका करत त्यांना धन्यवाद दिले. घुले यांचे हस्ते नाईक यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उतर देताना नाईक म्हणाले, माझ्या मातीतील माणसांनी केलेले कौतुक, गुरुजनांचे परिपूर्ण मार्गदर्शन, आणि अविरत केलेली साधना यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी इराण संगीत महोत्सवात मिळाली.

Mypage

शेवगाव सारख्या ठिकाणी पहिल्यांदाच होत असलेल्या सुफी गायन व शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमास जाणकार रसिक श्रोत्यांचा एवढा उत्तम प्रतिसाद
आमच्यासाठी खूप ऊर्जादायी आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष मनेष बाहेती सचिव प्रदीप बोरुडे, खजिनदार सुधाकर जावळे, भगनाथ काटे, युसुफ पठाण, अशोक लबडे, प्रा. काकासाहेब लांडे, डॉ .संजय लड्डा आदींनी परिश्रम घेतले.

Mypage

यावेळी विद्याधर काकडे, हर्षदा काकडे, अरुण लांडे, संजय फडके, नंदू मुंढे, विजय देशमुख, गुड मॉर्निंग ग्रुप, फिरस्ता संघ, गोविंदा ग्रुप तसेच नागरिक मोठ्या उपस्थित होते. 

Mypage