कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : पढेगाव येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच मीना शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे केंद्रीय राखीव दलाचे सेवानिवृत्त जवान दिलीप गिर्हे, विकास सोसायटीचे चेअरमन अशोकराव शिंदे तर न्यु इंग्लिश स्कुल माध्यमिक विद्यालयाचे उत्तम चरमळ यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
या उत्सवासाठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदू उसरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ सोळसे सर्व शिक्षक व विकास सोसायटीचे सचिव बाळासाहेब शिंदे आदींनी चांगल्या प्रकारे संचलन केले.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सालाबादप्रमाणे गावात प्रभातफेरी काढली होती. प्राथमिक शाळेत झेंडावंदन झालेनंतर गणेश दाणे यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी चिमुकल्यांनी देशभक्तीपर गिते आणि भाषणे सादर केली.
दिलीप गिर्हे, उत्तम चरमळ, संदीप शिंदे आदींची भाषणे झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास व्यवस्थापन कमेटीचे अध्यक्ष जगताप महाराज, सर्व व्यवस्थापन कमेटी, ग्रामपंचायत, सोसायटी सदस्य, माजी सरपंच प्रकाश शिंदे आदींसह मोठ्या संख्येने नागरीक पालक, पोष्ट विभाग आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सहशिक्षिका तांबोळी डम यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर विद्युल्लता आढाव यांनी आभार मानले.