संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या रोप लागवड यंत्राला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार – अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : देशातील  अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कृषी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी शेती पुरक तयार केलेल्या प्रोजेक्ट्सची  स्पर्धा नुकतीच सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएई) या जागतिक संस्थेच्या भारतातील एसएई इंडिया संस्थेमार्फत राहुरी येथिल महात्मा फुले कृषी विद्यापीठात तिफन (टेक्नॉलॉजी इनोव्हेशन फोरम फॉर अॅग्रिकल्चरल नर्चरिंग-कृषी  संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान मंच) अंतर्गत घेण्यात आल्या.

यात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी बनविलेल्या स्वयंचलित रोप पेरणी यंत्राला ‘बेस्ट इनोव्हेशन अँड डीझाईन’ पुरस्कार व रोख बक्षिस रू २५ हजार प्राप्त झाले असुन देश  पातळीवर संजीवनी नाविन्यपुर्ण बाबींमध्ये आघाडीवर असल्याचे सिध्द केले, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांचे शेतकऱ्यांच्या उपयोगी पडेल, असे प्रोजेक्टस् बनवा, असे सांगणे असायचे. यापुर्वी विध्यार्थ्यांनी कांदा लागवडीचे यंत्र बनविले होते. आता विध्यार्थ्यांनी दोन सऱ्यांच्या मधिल भरावावर रोप लागवडीचे यंत्र बनविले असुन या यत्रांचे देश  पातळीवरील यश महाविद्यालयानेे स्व. कोल्हे यांच्या स्मृतिस समर्पित केले आहे.

हे यंत्र ट्रक्टरने ओढले जावुन एकाच वेळी टोमॅटो, मिरची, वांगी, इत्यादी रोपांसाठी दोन सऱ्या पडुन, त्या सऱ्यांच्या मधिल भरावावर रोपाची लागवड होणार, रोपाभोवती मल्चींग पेपर अंथरल्या जाणार व लागलीच रोपाच्या शेजारून ठिबक सिंचनाची नळीही पसरल्या जाणार. असे या यंत्राचे कार्य आहे. या सर्व प्रक्रियेला एक एकर जमिनीत पारंपारीक पध्दतीने लागवड करायची झाल्यास सुमारे रू १०,००० इतका खर्च येतो (सरी आणि लागवड खर्च) व एक ते दिड दिवस खर्च होतो. मात्र या यंत्राद्वारे फक्त रू २४०० खर्च लागतो आणि अवघ्या चार तासात संपुर्ण लागवड होवुन ठिबकद्वारे पाणीही रोपांना सुरू होते.

प्रथम विध्यार्थ्यांनी आभासी पध्दतीने सादरीकरण दिले. अशा पध्दतीने देशातून २८ प्रोजेक्ट्सचे सादरीकरण होवुन त्यातुन २० प्रोजेक्टस् निवडल्या गेले. या सर्व प्रोजेक्ट्सचे प्रत्यक्ष कार्य आणि डीझाईन राहुरी येथे तपासले गले, यातुन संजीवनीचा प्रोजेक्टची डीझाईन आणि त्याद्वारे होणारे कार्य नानिन्यपुर्ण ठरले. या या यंत्रास रू ६५,००० इतका खर्च आला असुन सर्व खर्च महाविद्यालयाने दिला. या प्रोजेक्टचे सर्व यांत्रिकी काम संस्थेच्या वर्कशॉपमध्येच करण्यात आले.

मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद पटारे व प्रोजेक्ट गाईड प्रा.इम्रान सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार दत्तात्रय घुमरे (कॅप्टन), निखिल अशोक  देवकाते (व्हाईस कॅप्टन),शुभम संभाजी गवळी, अमोल भगवान गव्हाणे, साहिल रमजुद्दीन शेख, मोहित लक्ष्मण वाढे, रोहीत विजय सारंगकर, वरूण अनिल शेळके, संध्या जयकुमार देव्हारे, ईश्वरी  संतोश शिंदे , कृष्णा ज्ञानेश्वर महानोर, यांच्या सह दुसऱ्या  व तिसऱ्या वर्षातील  एकुण २५ विध्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट बनविण्यासाठी श्रम घेतले. यात ३० टक्के मुलींचाही सहभाग होता.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व नवनिर्मितीच्या ध्यास घेणाऱ्या  विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर अमित कोल्हे यांनी त्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. प्रसाद पटारे व मार्गदर्शक  प्रा. इम्रान सय्यद उपस्थित होते.