कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रेसर असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचा सन २०२३/२४ या वर्षाच्या ६९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार (दि.१७) रोजी सकाळी १०.०० वाजता उद्योग समुहाचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माझी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हा. डॉ. मच्छिंद्र बर्डे  व त्यांच्या सुविद्य पत्नी चित्रा बर्डे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून होणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे.

कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या आदर्श विचारांवर तसेच कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मागील वर्षी कारखान्याच्या पहिल्या टप्प्यातील आधुनुकीकरणाचे काम पूर्ण होवून मागील वर्षीचा गळीत हंगाम हा नवीन बॉयलर व नवीन मिलच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पडला आहे.

दुसऱ्या टप्यातील बॉयलिंग हाउसचे काम अंतिम टप्प्यात असून गळीत हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कारखान्याच्या या ६९ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बॉयलर अग्निप्रदीपन व विधिवत पूजा करून होणार आहे. या कार्यक्रमास सर्व सभासदांनी व कारखान्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे व  कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.