प्रो कबड्डीपटू श्रीकांत जाधव यांचा मातृभूमीत सन्मान

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ :  तालुक्यातील दहीगावनेचे भूमिपुत्र प्रोकबड्डीच्या बंगाल वारीयर्सचे खेळाडू श्रीकांत जाधव हे यंदाचा प्रो कबड्डी सामन्याचा थरार संपल्यानंतर आज सोमवारी शेवगाव येथे आले असतांना सामाजिक कार्यकर्ते समीर शेख व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने या खेळाडूचा सन्मान करण्यात आला.

       यावेळी समीर शेख यांच्यासह तुफेल मुलानी, लतीफ पटेल, जमीर शेख, शायद शेख, जावेद शेख, सलमान आतार, कैफ शेख, तोसीफ शेख यांच्यासह तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातील अनेकांची उपस्थिती होती. श्रीकांत जाधव यांनी आपल्या शेवगाव तालुक्याचा लौकिक देश पातळीवर पोहचविल्या बद्दल विविध मान्यवरांनी जाधव यांच्या खेळाचे व त्यांच्या कर्तबगारीचे कौतुक करून पुढील काळातही ते विविध स्पर्धेत प्रतिनिधित्व करून आपल्या नावाबरोबरच गावचे व तालुक्याचे नाव उज्वल करतील असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला.