रमजान ईदच्या मुहार्तावर अक्सा मस्जिद सभामंडपसुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : मुस्लिम बांधवांना अतिशय प्रिय असणाऱ्या पवित्र रमजान ईदच्या सणाचे औचित्य साधत आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील अक्सा मस्जिदच्या २५ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या सभामंडप बांधकाम व मस्जिद सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करून मुस्लिम बांधवांना अनोखी भेट देत त्यांचा आनंद द्विगुणित केला.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की,उन्हाचा पारा चढलेला असतांना अंगाची होणारी लाहीलाही, घशाला पडणारी कोरड अशा परिस्थितीत पवित्र रमजान महिन्यात रमजानचे रोजे पाळणं हे मोठ दिव्य दरवर्षी मुस्लीम बांधव पार पाडून अल्लाहचे आशीर्वाद घेतात.

ईद पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा दिवस. ‘रमजान ईद’ च्या दिवशी मुस्लीम बांधवांनी शुद्ध आचरण, शुद्ध आचार व विचारातून मनोभावे केलेले सामुदायिक नमाज पठण करून केलेली पार्थना निश्चितपणे अल्लाह पर्यंत पोहणार आहे. अल्लाहने हि प्रार्थना स्वीकारून सर्व मुस्लीम बांधवांना त्यांच्या जीवनात नेहमीच सुख-शांती देवून त्यांना दिर्घायुरोग्य लाभावे अशा शुभेच्छा आ. आशुतोष काळे यांनी मुस्लीम बांधवांना दिल्या.

कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘रमजान ईद’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लीम बांधवाना ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा दिल्या. मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘रमजान ईद’ व ‘अक्षय तृतीया’ हे दोनही सण एकाच दिवशी आले असल्यामुळे यावेळी अनेक मुस्लीम बांधवांनी आ.आशुतोष काळे यांना देखील गळाभेट घेवून त्यांना ‘अक्षय तृतीयेच्या’ शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मौलाना हमीदभाई राही, मौलाना आदीबभाई खान, माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, फकीर कुरेशी, अजीज शेख, इम्तियाज अत्तार, जावेद शेख, चांदभाई पठाण, शफीक शेख, नदीम मन्सूरी, कालू पेंटर, कलीमभाई, शकील खाटीक, पप्पु सय्यद, जमिल पठाण, जावेद शेख, मुन्ना सय्यद, शफिक सय्यद, रशीद शेख, छोटू पठाण, फिरोज सय्यद, समर शेख, मुक्तार शेख, सागीर शेख, जावेद खाटीक, अल्ताफ सय्यद, अल्ताफ पठाण, फिरोज कच्छी, फिरोज पठाण, शब्बीर खाटीक, युसूफ पठाण, अय्युब कच्छी, मोहसीन शेख, हारूण शेख, अस्लम शेख, समीर शेख, 

अजगर खाटीक, शकील खाटीक, शफीक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, मनोज नरोडे, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, रामदास केकाण, शिवाजी कुऱ्हाडे, मनोज कडू, राजेंद्र जोशी, शैलेश साबळे, गणेश बोरुडे, माणिक जाधव, अण्णाजी मासाळ आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.