१ नोव्हेंबर रोजी कोल्हे कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संचालक निवृत्ती कारभारी बनकर व मंदा बनकर या उभयतांच्या हस्ते, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे, स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता संपन्न होणार आहे.

Mypage

अशी माहिती उपाध्यक्ष मनेष दिनकर गाडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, व साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे यांनी दिली. सर्व उस उत्पादक सभासद शेतकरी बांधवांनी या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यांत आले आहे.

Mypage