कबड्डी स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय प्रथम

कोपरगाव प्रतिनिधी दि ०६ : कोपरगांव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाला तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा .बी .आर .सोनवणे यांनी दिली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर, तालुका क्रीडा समिती कोपरगाव व संजीवनी सैनिकी स्कूल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये विविध शाळा व महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने सहभाग घेतला होता.या शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोपरगाव येथील के .बी .रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाने विजय प्राप्त केला आहे. या विजयी संघाची निवड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी झाली आहे.

 तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाला विजेतेपद मिळाल्याबद्दल विजयी संघातील सर्व खेळाडूंचे संस्था व महाविद्यालयाच्या वतीने विश्वस्त संदिप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी .एस .यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर .सोनवणे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ .अभिजीत नाईकवाडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघास कनिष्ठ महाविद्यालयाचे शा. शि. शिक्षक एम .व्ही. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.