कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले.
यावेळी राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी प्रधानमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने निलीगिरी बाग हेलिपॅडकडे रवाना झाले.