ठेवींपेक्षा विश्वासाला जास्त महत्त्व – नितिनराव औताडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : बँकिंग क्षेत्रात होत असलेला काळानुरूप बदल पोहेगाव पतसंस्थेने स्वीकारला असून ग्राहकांना नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे उत्तम व तत्पर सेवा देत आहे. आरटीजीएस व एनएफटी सेवेबरोबर मोबाईल कलेक्शन ची सेवा सुरू असून पारदर्शी व्यवहारासाठी संस्थेने ग्राहकांना एसएमएस सेवा देखील उपलब्ध करून दिली आहे. संस्थेकडे आयएफएससी कोड असल्याने देश विदेशात थेट ग्राहकांना आपल्या खात्यावर पैसे जमा करता येतात.

संस्थेच्या पारदर्शक व्यवहाराच्या जोरावर संस्थेने चालू आर्थिक वर्षात 826 कोटी रुपयांची उलाढाल केली असून संस्थेने 127 कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा ओलांडला आहे.ठेंवीपेक्षा ठेवीदारांनी संस्थेवर टाकलेला विश्वास  जास्त महत्त्वाचा आहे. विश्वासाला पात्र असल्याचा आनंद असून विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन पोहेगांव नागरी पतसंस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे वक्रतुंड मंगल कार्यालया मध्ये पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोहेगाव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, शहराध्यक्ष कलविंदर दडीयाड, पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब रहाणे, माजी शहराध्यक्ष सनी वाघ, भरत मोरे, भाऊसाहेब कोळपे, अशोकराव नवले, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिवाजी खामकर, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, हिंदुहृदयसम्राट मान बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शांतीलाल जावळे, विलास चांदगुडे, अभिषेक आव्हाड, संस्थेचे उपाध्यक्ष विलास रत्ने, संचालक रमेश झांबरे, निवृत्ती औताडे, अशोक माळसकर, विनायक औताडे,

सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, रवींद्र औताडे, राजेंद्र औताडे, डॉक्टर जी टी जावळे, विश्वनाथ जावळे ,शिवाजी जावळे, कल्याण जावळे, हेमराज जावळे, सुभाष गरुड, संकेत कदम ,पियुष भालेराव, सुरेश भालेराव ,संजय कदम, पतसंस्थेचे व्यवस्थापक सुभाष औताडे, सह व्यवस्थापक विठ्ठल घारे, रमेश हेगडमल ,सोमनाथ मोजड, संस्थेचे अधिकारी पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.विषय पत्रिकेचे वाचन विठ्ठल घारे यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष विलास रत्ने यांनी केले.

सभासद, ठेविदार, हितचिंतक, संचालक मंडळ, कर्मचारी कलेक्शन प्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्याने संस्थेचा आर्थिक प्रगतीचा आलेख वाढत असून संस्था प्रगतीकडे वाटचाल करत आहे. संस्थेला क्यूआर कोड व एटीएम सेवा उपलब्ध झाली असून त्याचे वितरण लवकरच ग्राहकांना सुरू केले जाणार आहे यातून कॅशलेस व्यवहाराच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात संस्थेचा जास्तीत जास्त भर राहणार आहे असेही संस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे यांनी सांगितले. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळालेल्या नामवंतांचा गुणगौरव संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आला. यामध्ये हिंदुह्दय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांतीलाल जावळे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, कोण बनेगा करोडपती स्पर्धेत विजेते झालेले संकेत कदम, राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीत जिल्ह्यात प्रथम आलेले पियुष भालेराव यांचा सत्कार करण्यात आला.

1990 साली पोहेगाव नागरी पतसंस्थेची स्थापना करून शिर्डी कोपरगाव सारख्या ठिकाणी शाखा ओपन करून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना व्यवसायासाठी कर्ज वितरण केले. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला. अनेकांचे मोठमोठे व्यवसाय उभे राहिले त्यामुळे पोहेगाव पतसंस्थेचे संस्थापक  नितीनराव औताडे यांचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे आदींसह कोपरगाव तालुक्यातील  नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक सुभाष औताडे यांनी केले तर आभार संस्थेचे  संचालक रमेश झांबरे यांनी मानले.