माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या नांवे पुरस्कार देणार – अध्यक्ष विवेक कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ११ : साखर उद्योगात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशपातळीवर नांवलौकीक मिळविला असुन त्याची आठवण म्हणून राष्ट्रीय पातळीवर उस संशोधनात सर्वोच्च कामगिरी करणा-या एका शास्त्रज्ञास व सर्वोत्कृष्ट साखर कारखान्यांस सहकारमहर्षी, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या नांवे पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे यांनी करून त्याची रक्कम आयसीएआर-एसएसआरडी कोईमतूर तामिळनाडु संस्थेच्या संचालिका डॉ. जी. हेमप्रभा यांच्याकडे सुपुर्द केली. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते. 

आयसीएआर-एसएसआरडी कोईमतूर तामिळनाडु संस्थेच्या संचालिका डॉ. जी. हेमप्रभा यांनी नुकतीच संजीवनी उद्योग समुहास भेट दिली त्याबददल त्यांचा सत्कार करण्यांत आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

           सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने ६२ वर्षात केलेल्या नेत्रदिपक प्रगतीबददल डॉ. जी. हेमप्रभा यांनी प्रशंसा केली व शेतकरी सभासदांना जास्तीत जास्त उस वाणाबरोबरच अन्य पिकांचे उत्पादन कसे मिळेल याबाबत मार्गदर्शन करून नव्याने संशोधीत केलेल्या व जादा साखर उता-या देणा-या उसवाणाबददल शास्त्रोक्त माहिती देवुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या व्यवस्थापनाने उस विकासात केलेल्या कार्याचा गौरव केला.

          तसेच संजीवनी उद्योग समुहाचे प्रमुख बिपीनदादा कोल्हे यांनी डॉ. जी. हेमप्रभा यांना उस उत्पादन व उच्चतम साखर उता-यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे कार्यक्षेत्रात आवश्यक असणा-या उस वाणांची निर्मीती व संशोधन करून भविष्यात आयसीएआर व एसएसआरडी कोईमतूर तामिळनाडु यांच्यात प्रायोगिक तत्वावर शेती खात्यामार्फत प्रशिक्षण देवुन त्या त्या उस वाणांच्या लागवडीसाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याबाबत सुचना केल्या. 

           कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना देशपातळीवर सर्वप्रथम ज्युस पासुन इथेनॉल उत्पादन घेत असून अन्य रासायनिक उपपदार्थ निर्मीती बाबतची माहिती देवुन पॅरासिटामॉल औषधी उत्पादन प्रकल्पाची यशस्वी उभारणी सुरू केल्याचेही त्यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले. 

            प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक केले. ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, मानव संशोधन विकास अधिकारी प्रदिप गुरव यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीचा सचित्र आढावा यावेळी सादर केला. 

याप्रसंगी संशोधक डॉ. सी. अप्पण्णू, डॉ. श्रीनिवास व्ही., उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, त्रंबकराव सरोदे, रमेशराव आभाळे, ज्ञानदेवराव औताडे, आप्पासाहेब दवंगे, मनेष गाडे, निलेश देवकर, बापूसाहेब बारहाते, बाळासाहेब पानगव्हाणे, संजय औताडे, निवृत्ती बनकर, राजेंद्र कोळपे, सतिष आव्हाड, ज्ञानेश्वर होन, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, आदि खातेप्रमुख, उपखातेप्रमुख उपस्थित होते. उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.